बनावट हापूस आंबा विकल्यास होऊ शकतो गुन्हा दखल ?

उन्हाळयात आंब्याची चव घेतली नाही असा एक ही व्यक्ती सापडणार नाही. भारतीय व्यक्तींना आंबा हे फळ तर जिवा पाड प्रिय. तर चला बघू या फळाच्या राजा चा इतिहास…

हापूस आंबा आणि त्याची ओळख

कोकणचा राजा म्हणून हापूस आंब्याची ओळख आहे . तो मूळचा कोकणातला रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील हापूस लागवड मोठ्या प्रमाणात होते. भारत सरकारने हापूस आंब्याला GI tag म्हणजेच भोगोलिक दृष्ट्या हा आंबा महाराष्ट्रातील आहे म्हणून मान्य केले आहे. चवीला गोड, रसाळ  आणि बारीक कोय ही त्याची प्रमुख वैशिष्ट्य. 

हापूस आंब्याची लागवड

हापूस आंबा विशेष करून कोकणात लावला जातो. याचे वैशिष्ट्य की हा आंबा टेकडी वजा जागेवर लावतात आणि ही जागा सुद्धा एक विशिष्ट प्रकारची असते याचे वैशिष्ट्य असे की जिकडे समुद्र आहे. त्या भागाच्या टेकडीवर आपण आंबा लावतो आणि जितकी आंब्याची झाडे उंच टेकडीवर तेवढी ती गोड असतात. मधाळ चव असणारा हा आंबा खाणाऱ्या वर जादू सोडतो. मग दुसरे आंबे खावेसे वाटत नाहीत.

GI tag (भोगोलिक मानांकन)

भारत सरकारने योग्य प्रदेशातुन आलेल्या वस्तू ला त्याची योग्य किंमत मिळाली पाहिजे. त्यासाठी भारत सरकारने कायदा केला आहे त्याचे नाव भोगोलिक मानांकन होय. तेथील उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला त्याचा योग्य मोबदला मिळवा तसेच इतर त्यासारखे दिसणारे उत्पादन मूळ नावाच्या प्रसिद्धी वर विक्री करून ग्राहकाला गंडवू नये यासाठी भोगोलिक नामांकन दिले जाते.

तक्रार दाखल आणि दंड

जर मूळ वस्तू आणि त्या वस्तूला भोगोलिक मानांकन असून जर ती वस्तू मूळ नसून आणि त्या वस्तूच्या नावे विकली गेली तर त्या वस्तू विक्रेत्या वर दंड लावू शकतो. त्यावर रीतसर कार्यवाही होऊ शकते. जर खाण्याची वस्तू असेल तर त्या वस्तूवर बाजार व्यवस्थापन समिती कार्यवाही करू शकते . ती वस्तू जप्त करण्यात येते. आणि विक्री करणाऱ्या व्यक्तीला दंड आकारण्यात येऊ शकतो. इतकेच नव्हे तर त्या व्यक्ती ला तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

लेखक

– वैभव रूद्रवार

Editorial Team: Editorial Team By MarathiShout Publication
Recent Posts