महाराष्ट्र सरकारने जनतेला कमी पैशात पोट भरता यावे यासाठी शिवभोजन थाळी सुरू केली. अवघ्या ५ रुपयातही थाळी मिळते.अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविले जात आहे. रोज आपल्या राज्यातील काही लाख लोक या सेवेचा लाभ घेतात. अनेक गरजू लोक रोज ही थाळी न चुकता खातात.
काय असते थाळीत:
२चपात्या, एक सुकी भाजी, ताक, लोणची, डाळ,भात असे या थालीचे स्वरूप आहे. काही संस्था भाजी, डाळ दोन वेळा देतात. कधी कोनी काही आनंद सोहळा असल्यास काही गोड पदार्थ सुद्धा या थाळीत देतात.
नवीन खुशखबर:
थाळी ही फक्त संस्थांच्या आवारात असलेल्या जागेत खाता येत होती, परंतु आता ही थाळी पार्सल सुद्धा देण्यात येईल याची घोषणा मुख्यंत्र्यांनी नुकतीच केली आहे.