पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ एक नव्हे तर तब्बल तीन AK 94 रायफल्सचा वापर करून मुसेवालाची हत्या करण्यात आली. सिद्धू मूसेवालाचा (Siddhu Moosewala) खून (Murder) करण्यासाठी AN 94 रायफलचा (Rifle) वापर करण्यात आल्याचं सिद्ध झालं आहे. मूसेवालाच्या शरीरात झडनभरापेक्षाही जास्त गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, अशी माहिती त्याचं पोस्टमॉर्टेम करणाऱ्या ५ डॉक्टरांनी दिली होती.
AN 94 ची वैशिष्ट्ये
AN 94 ही रशियन बनावटीची ॲव्तोमॅट निकोनोव्हा (Avtomat Nikonova) जातीची रायफल आहे. १९९४ साली हे मॉडेल रशियानं बाजारात आणल्यामुळे तिला AN 94 हे नाव देण्यात आलं. गेनाडी निकोनोव्हा असं या रायफलीच्या निर्मात्याचं नाव. रशियातील पहिली निकोनोव्ह मशीन गन यांनीच तयार केली होती. AK 74 या रायफलीत काही बदल करून AN 94 ही रायफल निकोनोव्हा यांनी तयार केली.
AK 94 जास्त खतरनाक आणि दमदार
या रायफलचं एकमेव वैशिष्ट्यं तिला इतरांपेक्षा अधिक शक्तीशाली बनवतं. ट्रिगर दाबल्यानंतर बर्स्ट फायर करताना या रायफलीतून एकाच वेळी दोन गोळ्या बाहेर पडतात. त्यामुळे ज्याच्यावर या गोळ्या झाडल्या जातील, ती व्यक्ती वाचणं फारच दुर्मिळ असतं. मुसेवालावर याच जीवघेण्या रायफलीतून हल्ला झाल्यामुळे तो वाचणं जवळपास अशक्य होतं.
AN 94 ला ऑटोमॅटिक मोडवर टाकल्यानंतर ही रायफल ९०० मीटर प्रति सेकंद या वेगाने एका मिनिटांत ६०० राऊंड फायर करू शकते. AN 94 चं वजन आहे ३ किलो ८५० ग्रॅम आणि लांबी आहे ९४३ मिलीमीटर.
AK 47 की AN 94 कोन आहे घातक?
AK 47 पेक्षा AK 94 रायफलीतला मुख्य फरक म्हणजे फायरिंग करण्याची क्षमता. एकाच वेळी या बंदुकीतून दोन गोळ्या सुटतात. शिवाय या रायफलीतून सुटणाऱ्या गोळ्यांचा वेग हा AK47 पेक्षा जास्त असतो. AK 47 मधून सुटणारी गोळी ही ७१५ मीटर प्रतिसेकंद वेगाने जाते, तर AK 94 मधून सुटणाऱ्या गोळीचा वेग असतो ९०० मीटर प्रति सेकंद. AK 47 रायफलीची रेंज आहे ३५० मीटर, तर AK 94 ची रेंज आहे ७०० मीटर. म्हणजे तब्बल दुप्पट. शिवाय AK47 च्या तुलनेत ही बंदूक वजनाने १ किलो हलकी असते. मात्र AK 47 च्या तुलनेत याचा मेेेंटेनन्स जास्त असल्यामुळे रशियन सैन्यानं आता ही बंदूक वापरणं बंद केलं आहे