सिद्धू मुसेवाला याच्या वडिलांनी जोडले न्यायासाठी थेट गृहमंत्र्यांना हात…

मुसेवाला यांच्या दिवसाढवळ्या हत्येनंतर पंजाबमधील आप सरकारविरोधात घोषणाबाजी करत आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी चाहत्यांकडून केली जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर सिद्धू मुसेवाला यांच्या आई-वडिलांनी चंदीगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी सिद्धू मुसेवालाचे पालक गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी पोहोचताच ढसाढसा रडू लागले.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय यंत्रणांकडून केली जावी, अशीही मागणी त्यांनी केली. यावेळी त्या दोघांनही आपल्या मुलाला न्याय देण्याची मागणी केली. पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला यांची गेल्या रविवारी (२९ मे) गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती.

या घटनेनंतर पंजाब पोलिसांशिवाय हरियाणा आणि इतर राज्यांच्या पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे. पोलीस पथक दोन्ही वाहनांचा शोध घेत आहे. सीमावर्ती भागात वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.पंजाब सरकारने न्यायालयात महत्त्वाच्या व्यक्तींना पुन्हा एकदा सुरक्षा बहाल केली जाईल असे सांगितले होते. पंजाब सरकारने पंजाब आणि हरियाणामधील उच्च न्यायालयात याबाबतची माहिती दिली आहे.

येत्या ७ जूनपासून या महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा बहाल केली जाईल, असे सांगितले आहे.काही दिवसांपूर्वी पंजाबमधील भगवंत मान सरकारने राज्यातील काही माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली होती. त्यानंतरच सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यात आली होती

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts