श्रीलंकेत का आली आपातकाल ची घोषणा ? जाणून घ्या सविस्तर …

 

आपल्या नेहमीच अगदी जवळ 60 किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर असणारा देश म्हणजे श्रीलंका. पाल्क च्या समुद्र्धवानी ने श्रीलंका आणि भारताला वेगळे केले आहे. बघुया तर मग श्रीलंकेत काय चालले आहे.

 

श्रीलंकेची आर्थिक परिस्थिचा आढावा

गेल्या 20 वर्षापासून श्रीलंकेने आपल्या निर्यात पदार्था मधे कोणताही बदल केला नाही. फक्त वस्त्रे, टूरिज़म आणि कॉफी हेच श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचा कना मानला जातो. करोना ने टूरिज़म क्षेत्रा वर खुप मोठ्या प्रमाणात पर्यटक संख्या कमी केली आणि त्याचा श्रीलंकेला फटका बसला. रशिया आणि यूक्रेन च्या युद्ध परिस्थितिमुळे यूरोपीय तसेच राशियन पर्यटक कमी झाले. एकटया राशियतून 30 %पर्यटक श्रीलंकेत येतात .सध्या स्थिथित चालू असलेले युद्ध यामुळे पर्यटक क्षेत्र पूर्णपणे नष्ट झाले.  पेट्रोलियम पदार्थ आणि त्यावर अवलंबून असणारे घटक भारत श्रीलंकेला पुरवतो त्यामुळे एकन्दर जगातील पेट्रोलियम आणि त्यावर आधारीत पदार्थ  महाग झाले असताना श्रीलंकेला ते पर्वडनेसे झाले आहेत.त्यांच्याच परिणाम असा झाला की सामान्य माणसाला पेट्रोल ,डीज़ल घेणे दुरपास्त झाले.

 

राजपक्षे परिवार

गेल्या 20 वर्षापासून सत्तेत असलेले हे परिवार श्रीलंकेच्या पंतप्रधान, राष्ट्रपति आणि अनेक मोठ्या पदावर कार्यरत आहे. हे पूर्णपरिवार भर्ष्टाचारी आहे. मागील 20 वर्ष्याच्या कालावधीत त्यानी हवे नको असलेले बदल करुण घेवून श्रीलंकेचे सविधानात बदल करुण घेत आपलिच सत्ता राहिल याचे नियोजन केले. राष्ट्रपति गोटाबाया राजपक्षे यानी मध्यान्तरि निवडून आलेले मैत्रीपाल शिरिसेना याना नियोजित पद्धतीने पंतप्रधान पदावरुण दूर केले. भर्ष्टाचार आणि त्यामुळे आलेली दारिद्र्यता याला श्रीलंकेतिल सामान्य मानुस कंटळलेला आहे. त्यामुळे दोन दिवासापूर्वी थेट राजपक्षे च्या निवासस्थानी सामान्य जनतेने जाळपोळ केली ह्याला घबरुन च कि काय राजपक्षे परिवारने आपातकाल ची घोषणा केली.

 

श्रीलंकेचे सविधान आणि त्यातील आपातकालीन परिस्थिचे प्रावधान

श्रीलंकेत जेव्हा पंतप्रधान आपातकालीन घोषणा करतात तेव्हा त्याचा आपातकाल राष्ट्रपति आणि सुप्रिम कोर्ट यानी मान्य करायला हवा तेहि पुढील 14 दिवसात. जर राष्ट्रपति किवा कोर्टाने मान्य केले नाहीतर आपातकाल रद्द होतो. आपातकाला मुळे पंतप्रधान याना अनेक अधिकार प्राप्त होतात आणि त्याला कोर्टात जाब विचार्याची सोय नाहि .त्यामुळे सामान्य वर्ग त्रस्त झाला आहे. 

 

श्रीलंकेतिल सध्याची परिस्थिति आणि त्याची कारणे

राजपक्षे परिवार हे भारत विरोधी आणि चीनी धरजिने आहे. त्याचा असा परिणाम झाला की चीनी कर्ज वाढत गेले. अनेक निरूपयोगी योजना आणि निव्वळ भारताच्या द्वेष या मुळे चीन ला अनेकांनी पाठिम्बा दिला. आणि त्यातून हंबनटोटा सारख्या योजनावर करोड़ो रूपये खर्च झाले त्याचा परिणाम असा झाला की फॉरेन रिज़र्व कमी होत गेले.  आयात करणाऱ्या साध्या गोष्टी सुद्धा श्रीलंकेला स्वताच्या देशात तैयार करू शकला नाही तशी दूरदृष्टि असलेले नेते सुद्धा नसल्याने तेथील परिस्थिति उदभवली.

 

भयावह परिस्थिति- शहरातील बरेच लोक रात्रि जेवत सुद्धा नाहीत . दुकाने पोलिसांचे संरक्षण घेवून उघडावे लागतात. साठा करू नये यासाठी पोलिस घरोघरी जात झाड़ती घेत आहेत. 13 तासा पर्यन्त विजेची सोय नाही. स्वंयपाक सुद्धा चुलीवर. विद्यार्थयाच्या परीक्षा पेपर साठी पैसे नाहीत त्यामुळे परीक्षा च घेतल्या जात नाहीत. ही भयावहक परिस्थिति श्रीलंकेत आहे.

 

भारताची मदत

श्रीलंकेने भारताला द्वेषपूर्ण पद्धतीने वगवले . चीनी इन्वेस्टमेंट स्वीकारत भारताला धोका निर्माण होईल आसा श्रीलंका वगला. तरी सुद्धा भारताने शेजार धर्म म्हणून मदत करण्याचे पावले उचलली आहेत. भारताने एक मोठी तंदळाची खेप श्रीलंकेला पाठवली असून डीज़ल आणि पेट्रोल सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठवलेले आहे. भारताने दिलेली ही मदत सर्वात प्रथम श्रीलंकेला प्राप्त झाली आहे.

 

भारताला असलेले धोके

श्रीलंकेतिल बरेचसे लोक स्वतःचा देश सोडून भारतात येवू पाहत आहेत. याची सुरुवात सुद्धा झाली असून तमिलनाडू राज्यावर याचा बोजा येवू शकतो. त्यासाठी भारताने आपली तैयारी ठेवली पाहिजे . जे लोक येणार आहेत त्याना आडवले पाहिजे. 

 

लेखक 

वैभव रुद्रवार

Editorial Team: Editorial Team By MarathiShout Publication
Recent Posts