श्रीलंका संघाची आशिया कप २०२२ मधील कामगिरी जाणून घेऊया.

श्रीलंका संघाने आशिया कप २०२२ मध्ये साखळी सामन्यातील सुरवातीचा सामना हा अफगाणिस्तान संघासोबत खेळला असता. अफगाणिस्तान संघाने श्रीलंका संघावर ८ विकेट्सने विजय मिळवत श्रीलंका संघाला पराभूत केले.

 

साखळी सामन्यातील संघाचा दुसरा सामना हा श्रीलंका विरुद्ध बांगलादेश खेळला गेला. या रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेने पुरागमन करत बांगलादेश वर २ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेने पाकिस्तान ,भारत, व अफगाणिस्तान सोबत आशिया कपच्या 

पुढील टप्प्यात  सुपर ४ मध्ये स्थान मिळविले. 

 

सुपर ४ मध्ये श्रीलंका संघाची लढत अफगाणिस्तान संघासोबत झाली. या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानला कडवी झुंज देत विजयावर शिक्कामोर्तब   करत अफगाणिस्तान संघाला ४ विकेट्सनी पराभूत केले. या सोबतच  साखळी सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. 

 

त्यानंतर सुपर ४ च्या भारतीय संघाविरुद्ध च्या लढतीत सुद्धा विजयाची लय कायम ठेवत ६ विकेट्सनी  विजय मिळवला. 

 

श्रीलंका संघ दमदार कामगिरी करत पुढे पाकिस्तान संघाला सुद्धा ५ विकेट्सनी  मात दिली. 

 मुख्य म्हणजे आता पर्यंत आशिया कप २०२२ मध्ये श्रीलंका संघाने एकूण ५ सामने खेळले असता त्यापैकी केवळ एकमेव सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध गमावला. असून नंतर दमदार कामगिरी वरून हा संघ मजबूत वाटतो. 

 

आणखी हे वाचा :  ASIA CUP 2022: Dream11 Prediction Pakistan vs Srilanka ,Final

आणखी हे वाचा – आशिया कप २०२२: आशियाचा ” किंग ” कोण ?

 

आशिया कप २०२२ मधील अंतिम सामना हा श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान मध्ये रंगणार आहे.

Harshal Meshram:
Recent Posts