सुकेशने केला मोठा खुलासा, जॅकलिन, नोरा यांच्याशिवाय या तीन अभिनेत्रींशी सुकेशने केला होता संपर्क ?

सुकेश चंद्रशेखर याने केलेल्या २०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ईडी ची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान  आता आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील आणखी तीन अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. या तीन अभिनेत्री म्हणजे सारा अली खान, जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर. सुकेश ने सांगितले के तो सारा , जान्हवी, भूमी यांच्या संपर्कात होता व त्यानां महागड्या भेटवस्तू ही दिल्या. 

सुकेश चंद्रशेखर ने या तीन अभिनेत्रीचे नाव घेतल्याने आता या चौकशीला नवे वळण लागले आहे. याआधी सुकेशने जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांना भेटवस्तू दिल्या होत्या. एवढंच नव्हे तर जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश सोबतचे त्यांचे पर्सनल फोटोसुद्धा इंटरनेट वर व्हायरल झाले आहेत. 

सुकेश चंद्रशेखर याने केले्ल्या २०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची नावे आली आहेत.सुकेशने जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांना भेटवस्तू दिल्या होत्या.  आता या दोघांबरोबरच बॉलिवूडमधील आणखी या  तीन अभिनेत्रींना सुकेशने टार्गेट केले होते, अशी माहिती ईडीच्या तपासातून समोर आली आहे. दिल्या होत्या.

सुकेश चंद्रशेखर याची चौकशीमध्ये सारा अली खान, जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर यांची नावे घेतली. त्याने सांगितले की , २०२१ मध्ये साराला टार्गेट करायला सुरुवात केल होतं . २१ मे रोजी सुकेशने  व्हॉट्सअॅप वर सारा अली खान ला  मेसेज पाठवला होता. सुकेशने त्याची ओळख साराला सूरज रेड्डी अशी करून दिली होती. साराला पाठवलेल्या मेसेजमध्ये सुकेशने सांगितले की, तिला आणि तिच्या कुटुंबाला त्याला एक गाडी भेटी दाखल द्यायची आहे. याच संदर्भात त्यांची सीईओ मिसेस पिंकी ईरानी यांनी साराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु संपर्क होऊ शकला नव्हता. मिसेस पिंकी ईरानी ही सुकेशची साथीदार आहे. सुकेश आणि बॉलिवूडमधील अभिनेत्रींमध्ये संवाद घडवून आणण्याचे काम ती करायची. ईरानी हिने सुकेशची जॅकलिनशी भेट घालून दिली होती.

सूरज रेड्डी अर्थात सुकेश सातत्याने साराला मेसेज करत होता. सतत साराला महागड्या भेटवस्तू स्वीकारण्याची ऑफर देत होता. सारा अलीची ईडीने या भेटवस्तूंबाबत चौकशी केली होती. यासंदर्भात साराने ईडीला १४ जानेवारी २०२२ रोजी नोटीस पाठवली होती. त्यात तिने म्हटले होते की, सुकेश तिला सातत्याने भेटवस्तू पाठवण्याबाबत विचारत होता. परंतु तिने या भेटवस्तू घेण्यास नकार दिला होता. परंतु तो ऐकतच नव्हता त्यामुळे अखेर त्याला चॉकलेटचा एक बॉक्स पाठवायला सांगितले. तेव्हा त्याने चॉकलेटच्या बॉक्सबरोबर फ्रँक मलर कंपनीचे महागडे घड्याळ सुकेशने  पाठवले. या घड्याळ्याची किंमत लाखांपेक्षा अधिक आहे.  

सारा अली खान नंतर सुकेशने बायको लीना मारिया पॉलच्या माध्यमातून अभिनेत्री जान्हवी कपूरला टार्गेट करायला सुरुवात केली होती . लीनाने जान्हवीला तिची ओळख नेल आर्टिस्ट म्हणून करून दिली. १९ जुलै २०२१ मध्ये तिने जान्हवीला बेंगळुरमधील तिच्या सलूनच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले.सुकेश आणि लीनाची कोणतीही माहिती न घेता जान्हवी बेंगळुरच्या कार्यक्रमाला गेली. त्यावेळी लीनाने जान्हवीला १८.९४ लाख रुपये मानधन म्हणून दिले. तुरुंगात असताना सुकेशने एका उद्योगपतीच्या बायकोकडून जी खंडणी उकळली होती. त्यातील काही पैसे जान्हवीला दिले. हे पैसे लीनाने थेट जान्वहवीच्या खात्यात जमा केले होते. जान्हवीची ईडीने चौकशी केली होती तेव्हा तिने सांगितले की, त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी लीनाच्या आईने ख्रिश्टियन डियॉरची टोट बॅग भेटीदाखल दिली होती. चौकशीवेळी जान्हवीने ईडीला तिच्या बँके अकाऊंटचे सर्व माहिती दिली आहे .

सुकेशने भूमी पेडणेकर सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. 

मिस पिंकी ईरानी हिने सुकेशच्या वतीने भूमीला संपर्क केला.  जानेवारी २०२१ मध्ये पिंकीने भूमीला सांगितले की, तिच्या कंपनीचे ग्रुप चेअरपर्सन सुकेश चंद्रशेखर तिचे मोठे चाहते आहे. त्यांना तुझ्याशी एका मोठ्या प्रोजेक्टबाबत बोलायचे आहे. इतकेच नाही तर सुकेशला तुला एका गाडी भेटीदाखल द्यायची आहे. त्यानंतर सुकेशने स्वतःहून भूमीशी संपर्क साधला.  सुकेशने स्वतःची ओळख सांगताना शेखर अशी करून दिली. शेखर उर्फ सुकेशने तिला पिंकी ईरानीने दिलेल्या प्रोजेक्टच्या आणि गाडीच्या ऑफरबद्दल विचारले.  पिंकी ईरानीने भूमीला मेसेज केला होता त्यात तिने लिहिले होते की, सुकेश हा अब्जाधिश आहे. त्याला आपल्या मित्रमंडळींना भेटवस्तू द्यायला आवडतात. त्यामुळेच त्याला तुला गाडी भेट द्यायची आहे.  याप्रकरणी ईडीने भूमीची चौकशी केली असता तिने सुकेशकडून कोणतीही भेटवस्तू मिळाली नसल्याचे सांगितले.

पुढील ईडी चौकशीत आणखी खुलासे बाहेर निघण्याची शक्यता आहे मात्र यात कोण किती खरं आणि खोट माहिती सांगत  आहे हे शोधणे ईडी ला महत्वाचे आहे. 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts