कोरोनाची एवढी जबरदस्त भीती सामान्य माणसात पसरली आहे की एक वर्ष उलटून सुद्धा लोकांच्या मनात किरोना विषयी भीती कमी झाल्याचे दिसून येते नाही. अनेक रुग्ण तर कोरोना ने भयभीत होऊन आत्महत्येस ही प्रवृत्त्त झाल्याचे दिसून आले आहेत त्यातच आता एका मुलाने कोरोना च्या भीतीमुळे आपल्या वडिलांना मदत नाकारली.
मुरलीधरन असे या दुःखी पित्याचे नाव आहे.मुरलीधरन हे धापा टाकत असल्याचे दिल्ली स्तिथ, राजेंद्र नगर येथे पोलीस कर्मचाऱ्याला दिसले. राजू नामक पोलीस कॉन्स्टेबल कर्मचाऱ्याने या वृध्द माणसाची विचारपूस करून त्यांना त्वरित जवळील RML इस्पितळात त्यांना भरती करून घेतले. आणि त्यांची काळजी घेतली. राजू यांची फोटो सोशल मीडिया वर व्हायरल होत असून त्यांचे फार कौतुक होत आहे. याउलट मुरलीधरन यांच्या मुलाला नेटकरी समज देतानाही दिसून आले.
हे लक्षात घ्या:
कोरोना स्पर्शाने पसरतो, परंतु वेळोवेळी हात स्वच्छ धुतल्याने कोरोनाचे जंतू आपल्या हातावरून निघून जातात. कोरोना रुग्णाला हाताळताना काळजी घ्या,पण त्यांची मदतच करू नका असे म्हणणे चुकीचे आहे. सारे एकमेकास मदत करून आपण कोरोनाला नक्की हरवू शकतो. मास्क लावा, हात स्वच्छ करा आणि घरी रहा हेच या घटनेतून आपण बोध घ्यावा असे मराठी shout ची टीम तुम्हाला विनंती करत आहे.