या कंपनीचे इक्विटी शेअर्स होतील डिलिस्ट. मात्र दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जाणारी ही कंपनी गुंतवणूकदारांना काही दिवसात झीरो रिटर्न्स देणार आहे. मात्र ही नेमकी कंपनी कोणती ? या कंपनीत जर तुम्ही पण शेअर्स गुंतवले असतील तर व्हा सावधान !
शेअर मार्केटच्या बाजारात सद्या चर्चेत असलेली कंपनी हि कर्जात आकंठ बुडालेली आहे. आणि ही आहे सिंटेक्स इंडस्ट्रीज कंपनी. हि कंपनी येत्या काही दिवसातच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये विलीन होणार आहे. या सिंटेक्स इंडस्ट्रीज कमिटी ऑफ क्रेडिटर्सने आरआयएल आणि एसीआरईकडून सादर केलेल्या तोडग्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. या दरम्यान या कंपनीने दिलेल्या माहितीमध्ये असे सांगितले की कंपनीच्या सध्याच्या शेअर्स कॅपिटलला घटवून शून्य करण्यात येईल. व कंपनीला बीएसई आणि एनएसईकडून डिलिस्ट करण्यात येईल.
मात्र गुंतवणूकदारांनी ही बातमी कानी पडताच रीलायन्स इंडस्ट्रीजशी सिंटेक्सचं नाव जोडल्या गेल्यामुळे काही दरात शेअर्स खरेदी करण्यात सुरुवात केलेली आहे. पण मागील सोमवारी सिंटेक्स इंडस्ट्रीजचे शेअर्स हे ५ टक्क्यांचे लोअर सर्किट लागून ७.८ टक्यांवर बंद झाले होते.
सध्या परिस्थितीत कंपनीचे वाढते नुकसान हे गुंतवणुकदारांना काही दिवसात भोगावे लागू शकते. त्यामुळे जर तुमचे सिंटेक्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये पैसे गुंतवले असतील तर त्वरित हे शेअर्स विकून बाजूला होणे फायदेशीर ठरणार आहे. कारण या कंपनीचे सिंटेक्स इंडस्ट्रीजचे इक्विटी शेअर्स हे डिलिस्ट होणार आहेत.
लेखन :- प्रिया गोमाशे