दुबई : ICC T20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात खेळला गेला होता . दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
आधी बॅटींग करत पाकिस्तानने 177 धावांचे लक्ष ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स राखत या सामन्यात विजय मिळवला.ऑस्ट्रेलियाने सामना जिंकत फायनलमध्ये एन्ट्री घेतली (Australia Beat Pakistan By 5 Wickets) आहे आता फायनल मॅच ऑस्ट्रेलिया आणि नुझीलंड विरुद्ध खेळला जाईल.
प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने 20 षटकांत एकूण 4 बाद 176 धावा केल्या होत्या पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि फखर जमान यांनी अर्धशतके केलीत. रिझवान ने 52 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या तर फखर जमानने 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 32 चेंडूंत त्याने नाबाद 55 धावा केल्या व कर्णधार बाबर आझमने 34 धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 38 धावांत 2 बळी घेतले तसेच पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांनीही प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश मिळाले.
ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरने 49 धावा केल्या. तर मार्शने 28 रन बनवले . स्टोईनिसने (Marcus Stoinis) ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. तर वेडने (Matthew Wade) त्याची साथ निभावत पाकिस्तानकडून मॅच हिरावून घेतली .
ऑस्ट्रेलियाने आता फायनलमध्ये एन्ट्री केली आहे आणि त्यांचा सामना आता न्यूझीलंड सोबत होणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टोईनिसने 40 तर मॅथिव वेडने 41 रन्सची अतिशय जबरदस्त खेळी केली व पाकिस्तानला हरवून फायनलमध्ये एन्ट्री केली.