T20 World Cup 2021: शार्दुल ठाकूरचा भारतीय संघात समावेश.

हार्दिक पांड्या हा टी-२० विश्वचषकामध्ये (T20 World Cup 2021 ) गोलंदाजी करणार नाही हार्दिक पंड्या याची मेडिकल चाचणी नुसार तो गोलंदाची करू शकणार नाही त्यामुळे संघात संतुलन निर्माण करण्यासाठी अक्षर पटेल च्या जागी शार्दुल ठाकूरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.बीसीसीआयच्या मेडिकल टीमने दोन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याच्या फिटनेसचा रिपोर्ट घेतला होता. त्यानंतर मेडिकल टिमने याची माहिती बीसीआयला दिली.पांड्या या विश्वचषकामध्ये गोलंदाजी करण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे तो केवळ फलंदाजी करणार आहे 

मेडिकल टीमने दिलेल्या या माहितीमुळे BCCI ला T20 World Cup 2021 विश्वचषक संघामध्ये बदल करणे भाग पडले. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एकाने याबाबतची माहिती दिली. या अधिकाऱ्याने सांगितले की, “हे स्पष्ट आहे की, हार्दिक पांड्या गोलंदाजी करू शकणार नाही. तो विश्वचषकामध्ये फलंदाज म्हणून खेळणार आहे.  जर हार्दिक स्पर्धेदरम्यान पूर्णपणे तंदुरुस्त झाला तर त्याला गोलंदाजी करता येईल मात्र सध्या तरी त्याला गोलंदाजी करता येणे शक्य नाही. आम्हाला अक्षर पटेलबाबत वाईट वाटतं. मात्र संघामध्ये संतुलन साधण्यासाठी अक्षरला शार्दुल ठाकूरसाठी वाट मोकळी करावी लागली”.

अक्षर पटेलला संघाबाहेर काढण्यासाठी त्याची कामगिरी नाही तर हार्दिक पांड्याची सध्याची तंदुरुस्ती कारणीभूत ठरली आहे.निवड समितीने एक दिवसापूर्वीच अक्षर पटेलच्या जागी १५ सदस्यीय संघामध्ये वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला स्थान देण्यात आले.

निवड समितीने टी-२० विश्वचषकासाठी जो संघ निवडला आहे त्यामध्ये जसप्रीत बुमराह,  मोहम्मद शमी  आणि भुवनेश्वर कुमार  या  तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश होता. तर हार्दिक पांड्या हा चौथ्या वेगवान गोलंदाजाच्या भूमिकेत असेल. मात्र हार्दिक पांड्याने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात एकही चेंडू टाकलेला नाही. त्यामुळे निवड समितीने ऐनवेळी शार्दुलचा भारतीय संघात समावेश केला आहे.

भारतीय संघात अष्टपैलू म्हणून समावेश करण्यात आलेला शार्दुल ठाकूर चांगली फलंदाजी करतो. त्यामुळेच त्याला भारतीय संघात प्राधान्याने स्थान देण्यात आले. तर दीपक चहर हा स्टॅडबाय म्हणून संघासोबत ठेवण्यात आला आहे.

T20 World Cup 2021 Indian Team List | टी-२० विश्वचषकामधील भारतीय संघ :

फलंदाज :-  विराट कोहली(c), रोहित शर्मा(vc), के.ल .राहुल , सूर्यकुमार यादव 

विकेट किपर :- ऋषभ पंत , ईशान किशन 

ऑल राऊंडर :- हार्दिक पंड्या , रवींद्र जडेजा

स्पिनर :- राहुल चाहर , रविचंद्र अश्विन , वरून चक्रवर्थी 

वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमरा , मोहम्मद शमी , भुवनेश्वर कुमार , शार्दूल ठाकूर 

रिजर्व्ह खेळाळू : श्रेयस अय्यर , अक्षर पटेल , दीपक चाहर

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts