आला आला पावसाळा, त्वचेला असे सांभाळा…

पाऊस आपल्यासोबत फक्त आजारच नाही तर त्वचेचे इन्फेक्शनही घेऊन येतो. पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असतो , त्यामुळे चेहरा पुन्हा पुन्हा स्वच्छ करावा लागतो. पावसाळ्यात आजारांसोबतच त्वचेच्या समस्याही उद्भवतात. त्यामुळे पावसाळ्यात त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते. पावसाळा सुरू झाला की अनेक प्रकारचे संसर्ग पसरतात. जाणून घेऊया पावसाळ्यात त्वचेच्या काळजी घेण्याच्या काही टिप्स , ज्याचा उपयोग तुम्हाला त्वचेचे इन्फेक्शन दूर करण्यासाठी नक्कीच होईल.

१.जर तुमची त्वचा तेलकट असेल तर एक लहान चमचा पाण्यामध्ये लॅव्हेंडर तेलाचे दहा थेंब टाकून चेहऱ्याला लावा.

२.पावसाळ्याच्या दिवसात, त्वचेची छिद्रे बंद होऊ नयेत यासाठी दिवसातून दोन-तीन वेळा सौम्य क्लिंजर वापरून चेहरा धुवावा. याशिवाय ओटमील स्क्रब आणि पपईचा लगदाही वापरू शकता.

३. पावसाळ्यात दररोज रात्री अँटी-बॅक्टेरियल टोनर लावून झोपा. ज्यामुळे तुमच्या त्वचेची पीएच पातळी नियंत्रित राहील.

४.शरीराला विषारी पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या जेणेकरून तुम्हाला मुरुमांचा त्रास होणार नाही.

५.तुम्ही जर मेकअप लावत असाल , तर तो काढतेवेळी नीट काढा. यासाठी तुम्ही बदाम तेल तसंच खोबरेल तेलाचा वापर करू शकता.

६.ग्रीन टी, लिंबू आणि काकडी यांसारखे नैसर्गिक टोनर वापरा. टोनिंग केल्यामुळे त्वचेतील घाणही निघून जाईल आणि त्वचा कोरडीही होणार नाही.

७. पावसात चेहऱ्याशिवाय पाय आणि हातांना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसात भिजण्याचा प्रयत्न करू नका.

वरील उपाय केल्यास आपल्याला, पावसाळ्यात  अनेक विकारांना तोंड द्यावे लागणार नाही, अश्याच सोप्या टिप्स साठी मराठी Shout या आपल्या हक्काच्या पेज ला लगेच फॉलो करा आणि अनेक विषयांची माहिती मिळवा.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts