चहा सोबत कप पण बिस्कीट म्हणून खा,कोल्हापुरात बिस्कीट कप चा प्रयोग.


कोल्हापूरमध्ये सध्या या बिस्कीट कपची मोठी चर्चा आहे. इंजिनिअरिंग करणाऱ्या 3 तरुणांनी एकत्र येत या बिस्कीट कपची निर्मिती केली आहे. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून हे कप बनवण्याचा निर्णय या तरुणांनी घेतला

कसा आहे हा कप? आणि त्याची कशी चर्चा होतेय.

हा बिस्कीट कप आपण चहासोबत खाऊ शकता. कारण हा कप मैदा, साखर आणि कॉर्नफ्लॉवर पासून तयार केला आहे.
अनेक अडचणींवर मात करून त्याची मशीन या नव्या व्यावसायिकांनी आंध्रप्रदेशातील एका कंपनीतून आणली आहे. सगळे मिश्रण करून मशीन मध्ये टाकून एक बिस्कीट कप तयार करायला साधारण १०-१५ मिनिटे लागतात.

दिग्विजय गायकवाड यांचे हे बिस्कीट कप तयार करण्याचे श्रेय आहे. दिग्विजय हा फूड टेक्नॉलॉजी चा विद्यार्थी असून त्याने शिकता शिकता हा प्रयोग आणि स्वप्न सत्यात आणले असे त्याचे मित्र म्हणाले.



दुसऱ्या शहरात सुद्धा बिस्कीट कप ची वाढती मागणी.

अनेक लोकांना बिस्कीट कप ची कल्पना आवडली असून पुणे,नाशिक आणि ठाणे यांसारख्या शहरात सुद्धा या पर्यावरण पूरक बिस्कीट कपची मागणी वाढते आहे. कप हे पॅक सुधा कागदी पिशव्या वापरून या शहरात पाठवल्या जात असल्याने सगळी यंत्रणा ही पर्यावरण पूरक आहे. कोणाला कप न आवडल्यास ते बिस्कीट कप गुरांना खाण्यात देण्यात सुद्धा काही अडचण नाही.

source : BBC NEWS

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts