एक चांगला शिक्षक भारताचा राष्ट्रपती नक्किच होऊ शकतो. हे आहेत ते दोन व्यक्ती.
‘गुरु बिन ज्ञान न उपजै’ या ओळींचा अर्थ लक्ष्यात घेत गुरू हा प्रत्येकाचा वेगवेगळा असला तरी आपल्या गुरुंविषयी आदरभाव मात्र एकच असतो. आणि म्हणूनच आपल्या भारत देशात गुरू किंवा शिक्षकांना सर्वोच्च स्थान दिल्या जातं. आज घटनात्मकदृष्ट्या सर्वोच्च पद जर विचारलं तर ते म्हणजे राष्ट्रपतींचे असेल. खरंतर अगदी शालेय जीवनापासून शिक्षक दीन साजरा करत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे अगदी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय बनले आहेत. एकीकडे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि दुसरीकडे सध्या चर्चेत असलेल्या आदिवासी समाजातील कधीकाळी एक उत्कृष्ठ शिक्षिका असणाऱ्या माननीय द्रौपदी मुर्मू. ज्या आज भरताच्या राष्ट्रपती आहेत. कौटुंबिक संघर्षाची लढाई लढत, महत्वाकांक्षी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या या दोन व्यक्ती आज जणु शिक्षक दिनाचे मोठे आदर्शच ठरले आहेत.
कधीकाळी गरीब कुटुंबातील एक हुशार मुलगा दहावीची परीक्षा देतो परीक्षेचा उद्या निकाल असताना त्या मुलाची आई चिंतेत असते. अक्षरशः ती रडत असते. त्यामुळे त्या मुलाने आपल्याला प्रश्न विचारला आई तू का रडतेस ? तेव्हा ती म्हणते, बाळा तुझा उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आहे. तू पास होणार आहेस, हे देखील मला माहिती आहे. तू पास झालास तर पुढील शिक्षणासाठी मी तुला कशी शिकवू याची मला चिंता आहे. माझ्याकडे पुढील शिक्षणासाठी पैसे नाहीत. तेव्हा तो मुलगा आपल्या आईचे डोळे पुसत पुढे म्हणतो, आई तू काळजी करू नकोस मी फक्त परीक्षेत पास होणार नाही तर पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणार आहे. मला बक्षीस देखील मिळणार आहे आणि ते माझ्या पुढील शिक्षणासाठी पुरेसे आहे. तेव्हा हे ऐकून आईच्या मनाला दिलासा मिळाला. परंतु जोपर्यंत दहावीचा निकाल लागत नाही तोपर्यंत आईच्या मनावरचे दडपण काही कमी झाले नाही. परंतु तो शेवटी दिवस आला आणि दहावीचा निकाल लागला. तेव्हा तो मुलगा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्याला बक्षीस देखील मिळाले. तेव्हा आईला जणु आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते. या गोष्टीचा मात्र आईला आपल्या मुलाचा फार अभिमान वाटला. आणि हा तोच मुलगा होता जो मोठ्यापणी राष्ट्रपती झाला अर्थात हे होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. शैक्षणिक काळ संपल्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षक बनले. आणि या शिक्षक की पेशात त्यांनी स्वतःला झोकून देऊन कामाला सुरुवात केली. अत्यंत असामान्य कुटुंबात जन्म घेणारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राजकारणात झेप घ्यावी हा निर्णय त्याचं जीवन कायापालट करणारा होता. देशातील विविध विद्यापीठांसोबत ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी विद्यादान केले. त्यानंतर बनारस विश्वविद्यापीठाची जबाबदारी कुलगुरू म्हणून सांभाळली. त्यांना देशाचे पहिले उपराष्ट्रपती होण्याचा मान देखील मिळाला. १९५२ ते १९६२ या काळात ते देशाचे उपराष्ट्रपती होते. तर १९६२ ते १९६७ या काळात ते देशाचे राष्ट्रपती होते.
द्रौपदी मुर्मू यांचा शिक्षकी प्रवास.
एका सर्वसामान्य आदिवासी कुटुंबात जन्म झालेल्या द्रौपदी मुर्मू यांची यशोगाथा देखील फार खडतर आहे. खरंतर द्रौपदी यांनी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या मूळ जिल्ह्यातून पूर्ण केल्यानंतर भुवनेश्वरमधील रमादेवी महिला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून करिअरला सुरुवात केली आणि काही काळ या क्षेत्रात काम केले. आणि आज त्या आदिवासी समाजातील पहिल्या आणि देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. कौटुंबीक संकटांना सामोरे जात, एक शिक्षिका पेश्यात नोकरी करत त्या आज भरताच्या राष्ट्रपती आहेत. एक महिला शिक्षीका किती उंच आकाशात झेप घेऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. आणि ही आपल्यासाठी फार अभिमानाची बाब आहे.
शिक्षकदिन असा सुरू झाला.
१९६२ साली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती असताना त्यांच्या वाढदिवसादिवशी शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मित्र हे त्यांना भेटायला आले. त्यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण म्हणाले आज माझा जरी वाढदिवस असला तरी, केवळ माझा वाढदिवस साजरा न करता सर्व शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी शिक्षकांचा सन्मान करावा. अशी कल्पना स्वतः डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मांडली. आणि तेव्हापासून सर्व शिक्षकगणांचा मान राखत देशातील सर्व विद्यार्थ्यांसोबत वेगवेगळ्या शाळेत, महाविद्यालयात हा महत्वाचा दीन साजरा केला जातो. आपण देखील या शिक्षकरूपी गुरूंना नतमस्तक होऊन आपल्याला समृद्ध करणाऱ्या गुरूंचा मान राखत हा दीन साजरा करूया.