“विराट” खेळी व भुवनेश्वर च्या भेदक गोलंदाजीच्या भरवशावर भारताचा अफगाणिस्तान वर विजय !

आशिया कप २०२२: भारत संघाची कामगिरी काय ?

 

भारत संघाने आशिया कप 2022 मध्ये  एकूण 5 सामने खेळले असून. आशिया कप 2022 च्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून  पराभव करत , मागील वर्षीच्या टी 20 चषकातील पराभववाची परत फेड केली. त्या नंतर  हाँगकाँग ला 40 धावांनी नमवून आशिया कप मधील अ गटात अव्वल स्थान मिळवत दमदार कामगिरी केली. व  सुपर 4 मध्ये  अफगाणिस्तान ,श्रीलंका, आणि पाकिस्तान सह स्थान मिळवले. 

 

मात्र सुपर 4 च्या झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पराभव मिळवत सर्वाना धक्का दिला. आणि त्यानंतर झालेल्या  श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सुद्धा खराब कामगिरीसह आशिया कप 2022 मधील करोडो क्रिकेट प्रेमींचे स्वप्न चूर केले. 

अफगाणिस्तान विरुद्ध भारत यांच्यात दुबई येथे खेळल्या गेलेल्या आशिया कप २०२२ च्या सामन्यात  अफगाणिस्तान  संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी चा निर्णय घेतला.

रोहित शर्मा च्या अनुपस्तिथीत फलंदाजीस आलेल्या विराट ने राहुल सोबत दमदार सुरवात करत  12.4 ओव्हर मध्ये पहिल्या विकेटसाठी  119 धावांची भागेदारी केली. भारतसंघाकडून के एल राहुल 62 धावा तर विराट कोहली नाबाद 122 धावा.करत टी २० मधील पहिले शतक ठोकले.

 

टी २० प्रकारातील आता पर्यंतचे सर्वात जास्त धावसंख्या असणारे विराटचे आज चे टी २० इंटरनॅशनल मधील पहिले शतक होते.

भारताने प्रथम फलंदाजी करत २० ओव्हर मध्ये २१२ वर ५ बाद अशी विशाल धावसंख्या उभारली.

विजयासाठी मिळालेल्या २१३ धाव संख्येच्या पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाची सुरवात खराब झाली. ५. ५ ओव्हर अफगाणिस्तान संघ ५ बाद २० वर होता. भुवनेश्वर कुमार ने या सामन्यात मोठे धक्के देत सलामीवीरांना माघारी काढले.

भुवनेश्वर कुमार ने भारताकडून सर्वात जास्त विकेट्स ४ ओव्हर मध्ये केवळ ४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.अफगाणिस्तानचा संघ २० ओव्हर खेळत १११ धावसंख्येचा बदल्यात ८ गडी बाद झाले. या सह भारताने हा सामना १०१ धावसंख्येनी जिकला.

टी २० इंटरनॅशनल कारागीर्दीत प्रथम नाबाद १२२* धावा सह शतक झडकावणारा विराट कोहली सामनावीर ठरला.

आणखी हे वाचा : ASIA CUP 2022: Dream11 Prediction Pakistan vs Srilanka ,Super Four, Match 6

आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामना हा 11 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुबई इथे रंगणार असून. अफगाणिस्तान व भारत संघ या स्पर्धेतून बाद झाले आहेत.

 

आशिया कप 2022 मध्ये एकूण खेळल्या गेलेल्या 5 सामन्यातील कामगिरी पाहता. 

फलंदाजी व गोलंदाजी मधील कामगिरी पाहता. 

 

भारताकडून सर्वाधिक धावा 

Image Credit; Bcci twitter

 

 

  1. विराट कोहली 5 सामने  एकूण 276 धावा 2 वेळा 50+ धावासह  सर्वाधिक धावसंख्या नाबाद 122
  2. सूर्यकुमार यादव 5 सामने एकूण 139 धावा 1 वेळा 50+ धावासह  सर्वाधिक धावसंख्या नाबाद 68
  3. रोहित शर्मा 4 सामने एकूण 133 धावा 1 वेळा 50+ धावासह  सर्वाधिक धावसंख्या  72
  4. के एल राहुल  5 सामने एकूण 132 धावा 1 वेळा ५०+ धावासह  सर्वाधिक धावसंख्या  62

 

सर्वाधिक विकेट 

image credit : Bcci twitter

 

1. भुवनेश्वर कुमार 5 सामने  एकूण 11 विकेट 

2. अर्शदीप सिंग 5 सामने  एकूण 5 विकेट

3. युझूरवेंद्र चहल 4 सामने  एकूण 4 विकेट

4.  हार्दिक पांड्या  3 सामने  एकूण 4 विकेट 

Harshal Meshram:
Recent Posts