‘या’ इलेक्ट्रिक टू व्हीलरमध्ये शेवटचा मोड रिव्हर्स गियर असणार आहे. दिवाळीत होणार लॉन्च. जाणून घ्या भन्नाट ऑफर !

सध्या दिवाळीचे खास ऑफर असलेल्या सवलती दरात नवनविन electric two wheeler बाईकक्स लाँच होत आहेत. तसेच भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे आता वाहन निर्माता कंपन्यांमध्ये सपर्धा देखील वाढताना दिसत आहे. यातच अनेक नवीन वाहन कंपन्यांनीही मार्केटमध्ये एंट्री केली आहे. ज्यांच्या वाहनांना देखील भारतीय बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातीलच एक नाव म्हणजे Simple Energy. कंपनी लवकरच आपली नवीन electric two wheeler लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या ई-स्कूटरची चाचणीही सुरू करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपली electric two wheeler ऑक्टोबर किंवा डिसेंबरमध्ये लॉन्च करू शकते. मात्र याबाबत अद्याप कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

 

रिव्हर्स गियर मोड आणि रेंज

 

electric two wheeler बाईक्स म्हटलं की त्यांचा स्पीड, रेंज आणि लाँगलास्टिंगकडे ग्राहकांचे जास्त लक्ष असते. खरंतर कंपनीच्या नवीन स्कूटरमध्ये  वेगवेगळ्या मोड्सवर वेगवेगळी पॉवर रेंज आणि टॉप स्पीड मिळणार असल्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही ही स्कूटर इको मोडमध्ये चालवत असाल, तर ४५ किमी प्रतितास या मर्यादीत टॉप स्पीडसह, तुम्ही २३६ किमी पर्यंतची रेंज मिळवू शकता. तसेच तुम्ही ही electric two wheeler स्कूटर सोनिक मोडमध्ये चालवल्यास स्कूटरच्या टॉप स्पीड १०५ किमी प्रतितास, तिची पॉवर-रेंज थोडी कमी होऊन सुमारे १००-१०५ किमी होते. या electric two wheeler मध्ये शेवटचा मोड रिव्हर्स गियर मोड देण्यात आला आहे.

 

कंपनीच्या म्हणण्यानुसार, आपल्या स्कूटर सिंपल वनमध्ये कंपनीने नवीन बदलासह बॅटरी सेटअप सादर केला आहे. या electric two wheeler मध्ये ३.२ kWh चा एक निश्चित बॅटरी पॅक आणि १.६ kWh काढता येण्याजोगा मॉड्यूल आहे. ज्यामुळे ते दोन भागांमध्ये विभागले गेले आहे. फिक्स्ड बॅटरी पॅक फूट बोर्डवर आणि काढता येण्याजोगा बॅटरी पॅक सीटखाली ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना याच्या चार्जिंगबद्दल काळजी करण्याची गरज नाही. गरज भासल्यास सीटखालील बॅटरी पॅक बाहेर काढून चार्ज करण्यासाठी घरात आणता येऊ शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, काढता येण्याजोगी बॅटरी एका चार्जवर ४५-५० किमीपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे.

 

बाईकची किंमत 

 

कंपनीने अद्याप याच्या किंमतींचा खुलासा केलेला नाही. परंतु नवीन मॉडेलची किंमत कंपनीच्या सिंपल वनच्या किमतीपेक्षा कमी ठेवली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु या दिवाळी ऑफरमध्ये जर तुम्ही कोणती बाईक घेत असाल तर या electric two wheeler चा विचार नक्की करा.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts