प्रभासचा ‘आदिपुरुष’ या सिनेमाचा टिझर होतोय प्रचंड वायरल. सिनेमात नेमके कोण-कोण आहेत अभिनेते ?

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचे फॅन्स हे नेहमीच त्याच्या नवनव्या येणाऱ्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत  असतात. आणि आता तर प्रेक्षकांसाठी प्रभासच्या नवीन येणाऱ्या सिनेमाची जणू प्रेक्षकांना हुरहुरच लागलेली दिसते. होय, प्रभासचा येता नवा ‘आदिपुरुष’ सिनेमा सध्या खुप चर्चेचा विषय ठरत आहे. या सिनेमात प्रभास राम तर, सैफ अली खान रावण असलेला ‘आदिपुरुष’ या सिनेमाचा टिझर प्रचंड वायरल होतोय. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं चर्चेत असलेल्या ‘आदिपुरुष’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात बाहुबली फेम प्रभास एका वेगळ्याच अंदाजामध्ये दिसत आहे. बाहुबलीनंतर प्रभासनं मोजकेच सिनेमे केले आहेत. आता ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या सिनेमातून प्रभास पुन्हा एकदा पौराणिक भूमिकेत दिसणार आहे.

 

प्रभासचा येता नवा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा रामायणावर आधारित आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून तो सातत्यानं वेगवेगळ्या कारणानं चर्चेत होता. प्रभासचा सिनेमा त्यात रामायणावर आधारित असल्यामुळं या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्कंठा निर्माण झाली आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत अशा या सिनेमाचा टिझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सिनेमा थ्रीडी मध्ये असल्यामुळे प्रेक्षकांसाठी एक वेगळीच पर्वणी घेऊन येणारा हा सिनेमा ठरणार हे टीजरवरूनच कळतंय. 

 

खरंतर ‘आदिपुरुष’ सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सिनेमाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांनी केलं असल्यानं ही मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. बाहुबलीप्रमाणे ‘आदिपुरुष’ हा भव्यदिव्य सिनेमा असेल हे आधीच स्पष्ट झालं होतं. या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत दिसत आहे. तर क्रिती सैनन, सनी सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसत आहे. वेगवेगळी पात्र साकारणारे अभिनेते आणि अभिनेत्री या सिनेमात नेमके काय रंग भरतील हे येत्या काळात प्रेक्षकांच्या मार्फत कळेलच. 

 

खरंतर हा चित्रपट थ्रीडी अँक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. त्यामुळे हा सिनेमा येत्या आगामी काळात नक्कीच धूम ठोकणार आहे हे मात्र नक्की. त्यामुळे अनेक प्रेक्षक या सिनेमाच्या रिलीज होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts