गव्हर्मेंट ऑफ इंडिया तर्फे या योजना तुम्हाला देऊ शकतात अनेक रोजगार.

तुम्हाला माहिती आहे का केंद्र शासनाच्या अशा विविध योजना आहेत ज्या आपल्याला माहिती सुद्धा नाहीत परंतु त्या योजना आता आपल्याला आपल्याच मोबाईल मध्ये फक्त एका वेबसाईटच्या साहाय्याने क्लिक करून विविध योजना आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. होय ! आणि फक्त आपणच नाही तर आपले नाव आपले लिंग, वर्ग आपले वार्षिक उत्पन्न टाकून सगळ्या गोष्टी फिलअप करून आपण आपल्याला योग्य अशा योजना पहावयास मिळतील त्या योजना आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया कशी करावी ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

खरंतर गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडून या योजना सगळ्यांसाठीच उपयुक्त आहेत. त्यात खेळाडू, अपंग, मीडिया, युवक, बेरोजगार युवक, वयोवृद्ध कलाकार, स्त्रिया आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा अनेक योजना किंवा स्कॉलरशिप, विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप सुद्धा उपलब्ध आहेत फक्त आपण त्या कॅटेगिरी मध्ये बसतो की नाही हा प्रश्न आपल्याला विचारला जाईल त्यानंतर ते फॉर्म फिलअप करून अनेक विविध योजना आपल्यासमोर उपलब्ध असतील.

 

आता त्या योजना कोणत्या आहेत आणि त्या योजनांसाठी आपण लाभार्थी ठरू शकतो का ? हे बघणे सुद्धा महत्वाचे आहे. आपण त्या योजनांपासून कोणता लाभ घेऊ शकतो त्यांच्या कॅटेगिरीप्रमाणे त्यांच्या अटींमध्ये आपण पात्र ठरू शकतो का ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्याला त्या योजनेची वेबसाईट ओपन करावी लागेल. 

 

सर्वप्रथम आपण, www.myscheme.gov.in

या वेबसाईटला क्लिक करताच सर्वप्रथम Find Skim for you  येथे क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर Help us find the best schemes for you असे पेज तुमच्यासमोर येईल आणि त्याखाली आपले लिंग कोणते स्त्री किंवा पुरुष किंवा इतर याची निवड करायची आहे आणि पुढे आपली योग्य माहिती त्या रिक्त जागेत भरायचे आहे. आणि त्यानंतर तुमच्यासमोर विविध केंद्र शासनाच्या योजना तुम्हाला दिसतील. जसे, कृषी, ग्रामीण आणि पर्यावरण, बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा, व्यवसाय आणि उद्योजकता, शिक्षण आणि शिकणे, आरोग्य आणि निरोगीपणा, गृहनिर्माण आणि निवारा, सार्वजनिक सुरक्षा, कायदा आणि न्याय, विज्ञान, आयटी आणि कम्युनिकेशन्स योजना, कौशल्य आणि रोजगार, सामाजिक कल्याण आणि सक्षमीकरण योजना, खेळ आणि संस्कृती, वाहतूक आणि पायाभूत सुविधा, प्रवास आणि पर्यटन, उपयुक्तता आणि स्वच्छता,

आणि अशा बऱ्याचशा योजना तुम्हाला तिथे दिसून येतील परंतु तुम्ही कोणत्या कॅटेगिरी मध्ये बसतात यावरून त्या योजनांवर क्लिक करायचे आहे.

 

एका विशिष्ट योजना वर क्लिक केल्यानंतर त्या योजनेचे फायदे, पात्रता, अटी, लाभ आणि बरीचशी माहिती तुम्हाला तिथे मिळू शकेल. त्यामुळे काही बेरोजगार युवक-युवतींना किंवा दारिद्र्य रेषेखालील लोकांना, बीपीएलधारकांना सुद्धा यामध्ये सवलत आणि विविध योजना दिल्या गेल्या आहेत याचा सामान्य माणूस सुद्धा लाभ घेऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही देखील बेरोजगार असाल किंवा नोकरीवर असाल किंवा दुसऱ्या व्यवसायाच्या, नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला केंद्र शासनाच्या योजनांबाबत माहिती नसेल तर नक्कीच या वेबसाईटला क्लिक करा, या योजनेचा फायदा घ्या. आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts