उन्हाळ्यात कालीगड़ावर अनेक जण ताव मरतात .पण कलिंगड गोड नसेल तर मात्र रंगाचा बेरंग होतो . उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी काप, तसेच कलिंगड ज्यूस सर्रास वापरतात.कलिंगडाचा मगज रसाळ असतो. मात्र अनेक व्यक्तिना कालीगड कसे निवडावे माहिती नसते.त्यासाठी आपण गोड फळ कसे निवडावे याबदल ची माहिती पाहू.
जड आणि घन
सर्वसामान्य पने कलिंगड एक सारखे दिसत असतील अश्या दुकानातून घ्यावे. या वरुण आपणास कळते की सर्व फळास समान सूर्यप्रकाश आणि पानी मिळाले आहे. जड़ आणि घन असणारे फळ निवडावे.जर दोन फळ समान अकाराचे असतील तर त्यातील जास्त वजनाचे निवडावे. असे फळ खान्यास गोड आणि रसाळ असते.
नैकिंग (हाताने किवा बाटा ने मारने)
जर कलिंगडावर हाताने किवा बोटानी मरल्यास आवाज जास्त करेल असे फळ परिपक्व आणि रसाळ गराचे असते. आणि जे फळ कच्चे असेल त्याचा आवाज खोलवर येईल किवा फार कमी येईल.
स्क्रॅच किंवा कट मार्क्स
ज्या कालीगड़ावर स्क्रॅच किंवा कट मार्क्स कमी असतील असे फळ निवडावे हेच फळ जास्त पानी आणि समान सूर्यप्रकाश मिळालेले असते. कमी स्क्रॅच किंवा कट मार्क्स म्हणजे जास्त गोड फळ.
लेखन
वैभव रुद्रवार