ATM मधून पैसे काढताय ? तर मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

अनेकवेळा काहींच्या खात्यातून मोठी रक्कम लंपास झाल्याच्या घटना ऐकायला मिळतात. एटीएम कार्डच्या साहाय्याने पैसे काढताना थोड्या निष्काळजीपणामुळे हॅकर्स तुमची लाखो रुपयांनी फसवणूक करू शकतात. अशात, जर तुम्हालाही एटीएम फ्रॉड टाळायचे असेल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 

आज आम्ही तुम्हाला अशाच टिप्स सांगणार आहो, ज्यांच्या मदतीने तुम्ही ATM वापरताना होणाऱ्या फसवणुकीपासून दूर राहाल. 

 

घाई करू नका

 

घाईघाईत पैसे काढण्यासाठी अनेक जण मित्रांना किंवा नातेवाईकांना एटीएम कार्ड आणि पिन देतात . असे करणे अल्पावधीत सोयीचे असू शकते, परंतु दीर्घकाळात तुमची फसवणूक होऊ शकते. अशी चूक करू नका. जवळच्या लोकांनीच लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना गेल्या काही काळात समोर आल्या आहे. काही कारणास्तव तुम्हाला एटीएम पिन आणि कार्ड कुणाला द्यायचे असल्यास ताबडतोब कार्डचा पिन बदला आणि बँक स्टेटमेंट पहा. एटीएममधून पैसे काढताना एटीएम पिनचा वापर काळजीपूर्वक करा. तसेच, गुप्तपणे पिन एंटर करा. तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलात तेव्हा तेथे कोणीही नसावे. तेथे इतर कोणी असल्यास, त्याला बाहेर जाण्यास सांगा आणि संशय असल्यास, त्या एटीएममधून ताबडतोब बाहेर या.

 

सतर्क राहा 

 

एटीएममधून पैसे काढताना घाई करू नका. सर्वप्रथम, एटीएमच्या आतील बाजूस एक नजर टाका. एटीएम कार्ड स्लॉट देखील तपासा कारण स्कॅमर कधी- कधी एटीएममध्ये क्लोनिंग उपकरणे किंवा कार्ड रीडर चिप्स इन्स्टॉल करतात. हे उपकरण एटीएम कार्डचा डेटा चोरते आणि तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. अशा परिस्थितीत काही शंका असेल तर ते एटीएम वापरू नका.

 

पिन चेंज करतांना 

 

एटीएम मध्ये पिन चेंज करताना काही प्रक्रियांमधून आपल्याला जावे लागते अशा वेळेस आजूबाजूला पाहूनच नवीन पिन जनरेट करताना सावधगिरी बाळगा सोबतच आपण रिसेट केलेला पिन किंवा दुसऱ्यांदा टाकलेला पिन हा सक्सेसफुल अपडेट झालाय की नाही ते बघा किंवा कन्फर्म होण्यासाठी पिन चेंज केल्यानंतर तुमच्या खात्रिसाठी काही रक्कम काढून बघा.

 

असे पासवर्ड ठेऊ नका

 

एटीएम पिन वेळोवेळी बदलत राहिल्यास तुमच्यासोबत फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी होते. तसेच, विशिष्ट पॅटर्न किंवा तत्सम संख्यांचा पिन बनवू नका. तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबरचे अंक, 1111, 2222 सारखे अंक वापरू नका.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts