दरवर्षी रंगांची उधळणीचा सण असलेल्या धुलिवंदनाआधी होलिकेचं दहन करण्याची प्रथा आहे. होलिका दहन म्हणजे वाईटावर सत्याच्या विजयाचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे होलिका दहनावेळी आपल्या मनातील नकारात्मक विचारांना आहुती दिली जाते. असं मानलं जातं की होलिका दहनाच्या अग्निसमोर हात जोडून नमस्कार करुन मनातील सर्व नकारात्मक भावना दूर केल्यास जीवनातील सर्व नकारात्मकता संपुष्टात येते. यंदा १८ मार्च २०२२ रोजी होळीचा सण साजरा केला जाणार आहे. होलिका दहनाच्या वेळी काही उपाय केल्यास जीवनातील सर्व समस्या संपतात. या उपायांबद्दल जाणून घेऊयात.
या दिवशी अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय केल्यास सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. होलिका दहनाच्या दिवशी कोणत्या समस्यांवर काय उपाय केले जाऊ शकतात.
आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी जर तुमच्या कुटुंबात आर्थिक संकट असेल तर देशी तुपात भिजवलेले दोन बताशे, दोन लवंग आणि एक सुपारी अर्पण करावी. यामुळे घरातील पैशाचे संकट हळूहळू संपते आणि आर्थिक समस्या दूर होतात.
वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी खूप प्रयत्न करूनही लग्न ठरत नसेल हा अडथला दूर करण्यासाठी अख्ख्या सुपारीवर हळद टाकून होलिका दहनाच्या अग्नीत नैवेद्य दाखवावा. यासह भगवान महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान करा आणि ही समस्या दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करा.
जर कुणाच्या पत्रीकेत राहू च्या दशेमुळे समस्या निर्माण झाल्या असतील तर एक नारळ घेऊन त्याची शेंडी पूर्ण काढावी. नारळाला असणारा डोळा तोडून आतील पाणी पूर्ण काढावे, मग त्यात जवसाचे तेल भरावे. त्यामध्ये थोडा गुळ घाला आणी हा नारळ जळत्या होळीत अर्पण करा. या मुळे राहू चा प्रभाव समाप्त होतो.
दीर्घ आयुष्यासाठी आपल्या उंची एवढा काळ्या धागा घ्यावा. त्याच उंचीच्या आकाराचे समान लांबीच्या समान दोन ते तीन वेळा गुंडाळून तोडून टाका. होलिका दहन करताना हा धागा आगीत टाका. याने तुमच्यावरील सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)