यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर ! स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकशास्त्रातील पुरस्कार दिला जाणार.

नोबेल पारितोषिकाची सुरूवात ही पाच वेगवेगळया पारितोषिकांमुळे झाली जी, अल्फ्रेड नोबेलच्या १८९५ च्या मृत्युपत्रानुसार, “ज्यांनी मागील वर्षात मानवजातीला सर्वात मोठा फायदा दिला आहे त्यांना दिले जाते.” अल्फ्रेड नोबेल हे १८९६ मध्ये मरण पावले. तेव्हा त्यांच्या मृत्युपत्रात, त्यांनी आपल्या “उर्वरित प्राप्त करण्यायोग्य मालमत्ता” पाच पारितोषिकांची स्थापना करण्यासाठी विनियोग केला, जे “नोबेल पारितोषिक” म्हणून ओळखले जाऊ लागले. खरंतर नोबेल पारितोषिक प्रथम १९०१ मध्ये देण्यात आले. आणि तेव्हापासून या पुरस्काराची सुरूवात झाली. आणि आजही कायम ही परंपरा सुरू आहे. खरंतर नोबेल पुरस्कार हा जगभरात सर्वोच्च मानाचा समजला जाणारा पुरस्कार हा विशिष्ट क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या असामान्य व्यक्तींना दिला जातो. आणि परंपरेनुसार यावर्षी देखील हा पुरस्कार एका खास व्यक्तीला जाहीर झाला आहे. स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिकतेसंदर्भातील ( discoveries concerning the genomes of extinct hominins and human evolution ) अभ्यासासाठी त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी याबाबतची घोषणा केली.

 

कोण आहेत स्वांते पाबो ?

 

स्वांते पाबो हे पॅलेओजेनेटीक्सच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी निएंडरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. ते जर्मनीतील लीपझिंग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्यूशनरी एन्थ्रोपोलॉजी येथील जेनेटिक्स विभागाचे संचालकही राहिले आहेत.

 

पाबो यांनी आधुनिक मानवाच्या ‘जीनोम्स’ आणि आपल्या जवळच्या काळात धोक्यात आलेल्या प्रजाती, निएंडरथल्स आणि डेनिसोव्हन्स यांची तुलना करणाऱ्या संशोधनाचे नेतृत्व केले. या संशोधनाद्वारे या प्रजातींमध्ये मिश्रण असल्याचे समोर आले आहे. वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकांसह नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरू झाली आहे. आता मंगळवारी भौतिकशास्त्र, बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर होणार आहेत. 

 

गेल्या वर्षीचे वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेन पेटामूटियम यांना देण्यात आले होते. या दोन्ही संशोधकांना शरीराचे तापमान, दाब आणि वेदना या रिसेप्टर्सचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला होता.

 

 नोबेल पुरस्काराची रक्कम

 

पुरस्कारामध्ये एक कोटी स्वीडिश क्रोनर (अंदाजे रु. ७.३१ कोटी) रोख रक्कम असेल, ती १० डिसेंबर रोजी विजेत्यांना दिली जाईल. ही रक्कम स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या संपत्तीतून मृत्युपत्राद्वारे दिली जाते. त्यांनी या पुरस्काराची स्थापना केली होती. अल्फ्रेड नोबेल यांचे १८९५ मध्ये निधन झाले. 

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts