कार चालवताना झोप येते ? मग या नवीन गॅझेटबाबत नक्की जाणून घ्या.

कार खरेदी करतांना आपण आधी त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करत असतो. काही ग्राहक सुरक्षितता किती महत्वाची ते आधी बघतात. तसे, सध्याच्या आधुनिक कारमध्ये सुरक्षिततेशी संबंधित विविध फीचर्स दिलेली असतात. आधुनिक कार्समध्ये  कॅमेरा, वायरलेस फोन चार्जिंग, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, कनेक्टेड कार टेक, मल्टिपल एअरबॅग्स या फीचर्स सोबत दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान उदयास येत असतात. आणि ते ग्राहकांना अधिक आकर्षित करत असतात. त्यात काही तंत्रज्ञान सोयीस्कर तर काही निरर्थक असतात. परंतु आज आम्ही एका अश्या नवीन तंत्रज्ञाचा शोध घेऊन तुम्हाला आवडेल अश्या गोष्टीचा खुलासा करणार आहोत.

 

खरंतर अनेक अश्या अत्याधुनिक कारमध्ये अनेक अत्याधुनिक आणि नवनवीन सुरक्षा गॅझेट्स मिळतात. यामध्ये सहा एअरबॅगपासून ते सीट बेल्ट अलार्म आणि अनेक प्रकारचे सेन्सर यांचा समावेश आहे. काही गाड्यांना ADAS फीचर देखील मिळू लागले आहे. हे फीचर्स कार अपघाताचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. एवढ्या सुरक्षेनंतरही गाडी चालवताना मोठी अडचण दिसून येते. ती म्हणजे अचानक डोळा लागण्याची. अनेकवेळा गाडी चालवताना अचानक डोळ्यांवर झापड येते, झोप येते आणि अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता अधिक असते. अशा परिस्थितीत, एक गॅझेट उपलब्ध आहे, की जे ड्रायव्हरला झोप येण्‍यापासून रोखते. म्हणजेच, झोप येत असताना ते ड्रायव्हरला सावध करते, अलर्ट करते. ‘अँटी स्लिप आलार्म’ (Anti Sleep Alarm) नावाचे हे गॅझेट ड्रायव्हरच्या कानावर लावलेले असते, की जे ड्रायव्हरला झोप आल्यास सावध करते.

 

‘अँटी स्लीप अलार्म’ असे काम करते

 

हे गॅझेट अशा प्रकारे डिझाईन केले गेले आहे की, ते कानावर लावल्यानंतर ड्रायव्हरला झोप आल्याबरोबर सावध करते. यामध्ये स्विच ऑन आणि ऑफ बटण देण्यात आले आहेत. एका विशिष्ट कोनानंतर ड्रायव्हरचे डोके झुकताच हे गॅझेट अलार्म वाजवते. त्यामुळे चालक झोप येत असल्यास जागा होतो. याच प्रकारची विविध ब्रँडचे गॅझेट्स बाजारात आहेत, की जी गाडी चालवताना वापरता येतात. मात्र, ती वापरताना विशेषतः ऑनलाईन खरेदी करताना त्यांचे रिव्ह्यू पाहूनच ती खरेदी केलेली बरी. ‘अँटी स्लीप अलार्म’ हे गॅझेट ई-कॉमर्स साईट्सवर उपलब्ध असून त्याची किंमत ४९९ रुपये आहे. आणि इतरही ब्रँडचे गॅझेट्स वेगवेगळ्या किमतीत तुम्हाला किफायतशीर दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे या नवीन तंत्रज्ञानाचा नक्की वापर करा. आणि इतरांना देखील सांगा.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts