सध्या चर्चेत असलेला टोमॅटो फ्लू आजार काय आहे जाणुन घ्या

टोमॅटोचा रंग लाल तसाच लाल पुरळ येणाऱ्या या आजाराची चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे.  कोरोना महासाथीतून उसंत मिळत असतानाच आता केरळात ‘टोमॅटो फ्लू’ या नवीन आजाराने डोके वर काढले आहे. पाच वर्षांखालील मुलांना या विचित्र आजाराची लागण होत असल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी निपाह या आजाराने केरळमध्ये थैमान घातले होते. आता टोमॅटो फ्लूमुळे घबराट पसरली आहे. हा आजार टाळण्यासाठी कोणती खबरदारी बाळगायला हवी याबाबत माहीत करून घ्यायला हवं. चला तर मग सध्या चर्चेत असलेल्या या आजाराची माहिती जाणून घेऊयात. 

 

केरळमध्ये होतोय फैलाव

 

केरळमध्ये टोमॅटो फ्लूचे ८० बालरुग्ण आढळून आले आहेत. तामिळनाडू आणि केरळ सीमेवरील काही जिल्ह्यांतही रुग्ण आढळले आहेत. आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या असून तातडीने रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तामिळनाडूनेही आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

 

आजाराचे कारण हे आहे.

टोमॅटो फ्लू कशामुळे होतो, याचा कोणताही तपास अद्याप लागलेला नाही. वैद्यकीय तज्ज्ञांनाही या आजाराची कारणे शोधण्यात यश आलेले नाही.

 

ही आहेत टोमॅटो फ्लूची लक्षणं

 

टोमॅटो फ्लूमध्ये चिकुनगुनिया सारखीच काही लक्षणे असतात, जसे की खूप ताप, अंगदुखी, सांधे सुजणे, थकवा. तथापि, संक्रमित मुलांना पुरळ आणि त्वचेची जळजळ देखील होते, ज्यामुळे शरीराच्या काही भागांवर फोड येतात. पोटदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब, हात, गुडघे, मागचा भाग यांचा रंग बदलणं ही काही इतर लक्षणे आहेत. दुसरीकडे, या आजारामागील नेमके कारण अद्याप समजलेले नाही आणि आरोग्य अधिकारी अद्याप टोमॅटो फ्लूच्या मुख्य कारणांचा शोध घेत आहेत.

 

उपचार असे करा.

टोमॅटो फ्लू संसर्गजन्य असल्याने, रोगाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमित व्यक्तीशी जवळचा संपर्क टाळला पाहिजे. तामिळनाडू-केरळ सीमेवरील वालार येथे एक वैद्यकीय पथक कोईम्बतूरमध्ये ताप, पुरळ आणि इतर आजारांसाठी दाखल होणाऱ्यांच्या चाचण्या करत आहे, असे पीटीआयने वृत्त दिले आहे.

प्रतिबंधात्मक उपाय कोणते करावेत ? 

सर्वप्रथम, स्वच्छता राखली पाहिजे.

योग्य हायड्रेशनचा देखील सल्ला दिला जातो.

 

वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसू लागल्यास पालकांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

संक्रमित मुलांनी स्क्रॅचिंग रॅशेस किंवा फोड टाळावे कारण यामुळे ते आणखी वाढेल

विशेषत:  साधारण: ५ वर्षाच्या जवळपास असणाऱ्या लहान मुलांना हा आजार होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य ही दोन पथ्ये पाळणे आवश्यक आहे. शरीरातील पाणी कमी होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागते. ज्या पालकांना आपल्या मुलांमध्ये टोमॅटो फ्लूची लक्षणे आढळतील त्यांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts