नेमकी काय करते ही रेमडेसिवीर, ज्याच्या नावाचा सध्या डंका वाजत आहे ?

करोनाबाधितांच्या उपचारासाठी रेमडेसिवीरला मोठी मागणी आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला असून काळाबाजारही सुरू असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिवीर खरेदी करण्यासाठी तासनतास लोक रांगेत उभे राहत आहेत. मात्र, रेमडेसिवीर कितपत प्रभावी आहे, यावर प्रश्नचिन्ह आहे.

कोणत्या आजारासाठी सर्व प्रथम तयार झाले होते रेमडेसिवीर?

‘रेमडेसिवीर’ला ‘ इबोलावर ‘औषध म्हणून विकसित करण्यात आले होते. मात्र, रेमडेसिविरवर हे अन्य काही विषाणूंवर प्रभावी ठरू शकते. रेमडेसिविर हे शरिरात करोना विषाणूची संख्या वाढवणाऱ्या एन्जाइमलाच अटकाव करते. त्यामुळे विषाणू शरिरात फैलावत नाही. एका संशोधनात आढळले की, रेमडेसिवीरने SARS आणि MERS विषाणूंना अटकाव केला आहे. मागील वर्षी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची बाधा झाली होती. त्यावेळी त्यांच्यावर उपचार सुरू असताना हेच औषध देण्यात आले. अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील एका महिलेने करोनाबाधित पतीला रेमडेसिवीर दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि घरी परतले असल्याचाही अनुभव सांगितला.

मात्र, जागतिक आरोग्य संघटनेचे ‘रेमडेसिवीर’बाबत काहीसं वेगळं मत आहे. एका क्लिनिकल चाचणीतील डेटानुसार हे औषध फारसं प्रभावी ठरले नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या Solidarity Trial ने सांगितले की पाच हजार जणांवर करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार, करोनाची बाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर रेमडेसिवीरचा फारसा परिणाम झाला नाही.
या निष्कर्षासाठी मृत्यूदर, व्हेंटेलेशनची आवश्यकता आणि रुग्णालयात दाखल राहण्याची वेळ आदी निकष पाहण्यात आले होते. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांच्या यादीतून रेमडेसिवीरला वगळले. शिकागो विद्यापीठ आणि टेक्सास विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार रेमडेसिवीरमुळे काही दिवसांसाठी विषाणूंचे रेप्लिकेशन थांबवले जात असल्याचे म्हटले जाते.

काळा बाजार आणि वाढत्या किमती:

रेमडेसिवीर औषधांच्या वाढत्या किंमती आणि काळ्या बाजारामुळे विविध राज्य सरकार आणि केंद्र सरकारसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. Zydus चे इंजेक्शन ८९९ रुपयांना मिळत असून पाच दिवसांच्या कोर्ससाठी ४५०० रुपये खर्च करावे लागत आहे. वाढत्या मागणीमुळे काळाबाजारही सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने रेमडेसिवीरची किंमत ही ११०० ते १४०० च्या घरात ठेवली आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts