नव्वदच्या दशकात नागपूर रेल्वे स्थानकाबाहेर संत्री विकणारे खान आता मोठे वाहतूकदार म्हणून ओळखले जातात. पोटापाण्यासाठी त्यांनी पूर्वी रिक्षाही चालवली होती. खान यांच्या आश्मी रोड करिअर्स प्राइव्हेट लिमिटेड या कंपनीकडं तब्बल ३०० ट्रकचा ताफा असून त्यांच्या कंपनीचे बाजारमूल्य ४०० कोटी इतके आहे. गरिबीतून वर आलेल्या प्यारे खान यांना तळागाळातील परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. या जाणिवेतूनच जीवनमरणाशी झुंजणाऱ्या करोना रुग्णांच्या मदतीसाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे.
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या नागपुरातील एका उद्योजकानं माणुसकीचा असाच आदर्श घालून दिला आहे. प्यारे खान नामक या उद्योजकानं नागपूर व परिसरातील सरकारी रुग्णालयांना आठवड्याच्या आतच सुमारे ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. विशेष म्हणजे कर्तव्यभावनेतून त्यांची ही सेवा सुरू आहे.
अवघ्या आठवडाभरात प्यारे खान यांच्या कंपनीनं करोना रुग्णांना ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:च्या खिशातून तब्बल ८५ लाख रुपये खर्च केले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या ३६० सिलिंडरसह एकूण ८६० सिलिंडर त्यांनी वेगवेगळ्या रुग्णालयांना पुरवले आहेत. रायपूर, रुरकेला व भिलई येथे टँकर पाठवून, तिथून ऑक्सिजन भरून घेऊन तो नागपूर व आसपासच्या परिसरात पुरवण्याचं काम ते करत आहेत.
मुस्लिम धर्मियांत रमजान महिना जकात चे असते फार महत्व:
प्यारे खान यांच्या या कामाचा पूर्ण मोबदला देण्याची तयारी प्रशासनानं दर्शवली आहे. मात्र, हे पैसे न स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. रमझानच्या पवित्र महिन्यातील ही ‘जकात’ आहे. हे माझं कर्तव्यच आहे. मानवतेची ही सेवा आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘ऑक्सिजन दान करून समाजाची सेवा करण्याची ही संधी आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना संकटाच्या काळात याचा आधार मिळेल. गरज भासल्यास ब्रुसेल्स येथून काही टँकर एअरलिफ्ट करण्याची तयारी देखील आमची तयारी आहे,’ असं प्यारे खान यांनी म्हटलंय.
आई.आई.यम मध्ये ही झेंडा रोवनारे प्यारे खान आहेत अभ्यासाचा विषय:
युवा ट्रान्सपोर्टर साठी आयोजित ,एका आई .आई. यम. आणि महिंद्रा ट्रक्स यांच्या मध्यस्तीतून आयोजित एका कार्यक्रमात प्यारे खान अग्रेसर होते. या कार्यक्रमात १८ लोक सहभागी झाले होते, २ तर अमेरिकेतील सुद्धा होते. लॅपटॉप कम्प्युटर वापरून अनेकांनी इंग्रजी तून त्यांनी त्यांचे मुद्दे सांगितले. पण आपल्या प्यारे खान यांनी हिंदीत मुद्दे मांडून आपले विचार मांडले आणि जिंकून आले.