पावसाळ्यात आवर्जून खा या रानभाज्या.

पावसाळा म्हटलं की सगळीकडे हिरवागार शालू पांघरलेली धरणी दिसते. त्या हिरळीत अनेक विविध रंगी रानभाज्या देखील उगवत असतात. अनेक गृहिणींना याबाबत माहिती असून अनेकांच्या घरी मात्र आवडीने पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्यांचा आहारात समाविष्ट देखील करतात. पावसाळा आणि हिवाळ्याचा सुरुवातीचा काळ हा रानभाज्यांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असतो. या काळात भरपूर प्रमाणात रानभाज्या उपलब्ध असतात. रानभाज्या वर्षातील काही महिनेच मिळत असतात. त्यामुळे मिळतात, तोपर्यंत पुरेशा प्रमाणात खाऊन घ्याव्यात. कारण त्यांच्यामध्ये भरपूर पोषणमुल्ये असतात. खाली दिलेल्या या अशाच काही रानभाज्या आणि त्यांचे फायदे.

 

मशरूम – 

image credit :- iStock

मशरूमच्या विविध पाककृती बनवणे खूप सोपे आहे. आपण आपल्या रोजच्या आहारात कोशिंबीर, भाजी किंवा सूपसारख्या पदार्थांतून ‘मशरूम’चा समावेश करू शकता. मशरूममध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे आपल्या शरीरातील पेशी नष्ट होण्यापासून रोखतात आणि ते विनामूल्य मूलभूत नुकसानापासून संरक्षण करतात. ‘व्हिटामिन डी’ शरीरासाठी खूप महत्वाचा घटक आहे. शरीरात ‘व्हिटामिन डी’ची कमतरता असल्यास बरेच आजार उद्भवतात. नैसर्गिकरित्या ‘व्हिटामिन डी’ आढळणाऱ्या भाज्या आणि फळे तशी कमीच आहेत.

 

अळू- 

image credit iStock

 

यामध्ये व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हृदयराेगाचा आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. हाडांना बळकटी देण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही उपयुक्त.

 

कर्टोली- 

image credit:-iStock

 

या भाजीमध्ये प्रोटीन्स, आयर्न, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या वेगवेगळ्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त. पोटावरची चरबी कमी करण्यासाठीही फायदेशीर

 

टाकळा- 

image credit:-iStock

 

सर्दी, ताप, खोकला असे संसर्गजन्य आजार कमी करण्यासाठी ही भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच अनेक त्वचाविकारांवरही टाकळा प्रभावी ठरतो.

 

आघाडा- 

image credit:-iStock

 

पावसाळ्यात वारंवार होणारे अपचन, पोटदुखी, वात असा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त. आघाड्याची पावडरही अनेक आयुर्वेदिक औषधींमध्ये वापरली जाते. मुळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठीही फायदेशीर.

 

अंबाडी- 

image credit:-iStock

 

या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, लोह, झिंक भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ही भाजी नेत्रविकार दूर करण्यासाठी तसेच अशक्तपणा कमी करण्यासाठी मदत करते. या भाजीमध्ये व्हिटॅमिन्सही भरपूर असतात.

 

चंदनबटवा- 

image credit:-iStock

 

बद्धकोष्ठता, अपचन, पोटात वारंवार गॅसेस होणे, या सगळ्यांवर उत्तम घरगुती उपाय म्हणजे चंदनबटव्याची भाजी खाणे. या भाजीमध्ये फायबर तर भरपूर प्रमाणात असतातच, पण खनिजे आणि व्हिटॅमिन्सही पुरेशी असतात.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts