बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
२०२१ च्या अखेरीस हे दोघे राजस्तानमधील एका मोठया पॅलेस मध्ये लग्न करणार आहेत अशे म्हटले जाते.अद्याप दोघांनीही याबाबत कोणतीही प्रतिकिया दिलेली नाही मात्र तांच्या जवळच्या मित्रमंडळी कडून हि बातमी मिळालेली दिसते.
विकीच्या लग्नाच्या गोष्टीला तुफान आल्यापासून त्याची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीदेखील चर्चेत आली आहे. हरलीनची या लग्नाबद्दल प्रतिकिया जाणून घेण्यास सगळे उत्सुक आहेत.
हरलीन ने याबाबत कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण , तिच्या मित्र–मैत्रणींकडून याबाबत बरीच माहिती सूत्रांना मिळाली.
तिच्या जवळच्या मित्राकडून मिळालेल्या माहितीवरून अशे कळले कि , हरलीन हि आता आपल्या पुढच्या आयुष्याच्या मार्गस्थानी लागली आहे आणि तिला तिच्या भूतकाळाच्या गोष्टींबद्दल काही रस नाही.
विकी आणि हरलीन यांच्या नात्यातील रंग अचानकपणे बदलला,त्यामुळे त्यानचे ब्रेकअप झाले आणि ‘संजू’ आणि ‘उरी’च्या यशानंतर विकी पूर्णपणे बदलला होता अशे माहिती हरलीनच्या मित्राकडून मिळाली.
हरलीन सेठीला तिचा भूतकाळाचा कोणताही त्रास होत नाही, तसेच तिला एक्स बॉयफ्रेंड विक्की कौशलची कतरिना कैफसोबतच्या जवळीकीची अजिबात कोणती चिंता राहिली नाही. हरलिन शेठी विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या बातमीने ती आनंदी आहे,अशी माहिती तिच्या मित्राने सूत्रांना दिली.
हरलीन खऱ्या अर्थाने खूप पुढे गेली असून ती आपल्या ती कामात खूप व्यस्त आहे. ती एकता कपूरच्या ‘द टेस्ट केस 2’ बद्दल खूप उत्सुक आहे आणि तसेच तिने नुकताच एका चित्रपटातील गाण्यासाठी शूट केले.
हरलीन आणखी एका वेब शोसाठी चर्चेत आहे. आणि अर्थातच, एकता कपूरच्या “ब्रोकन बट ब्यूटीफुल” या वेब शोसाठी तिची खूप प्रशंसा झाली होती.
हरलीन विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नावरून होणाऱ्या चर्चांसाठी अजिबात उत्सुक नाही. तिला याबाबत कसलीही चिंता नसून ती आपल्या आयुष्यात पुढे गेलेली दिसते.