आशिया कप २०२२ मधील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर सुपर ४ मधील संघाचा शेवटचा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध दुबई इथे खेळला गेला. अफगाणिस्तान व भारत संघ या स्पर्धेतून बाद झाले आहेत.
अफगाणिस्तान विरुद्ध भारत यांच्यात दुबई येथे खेळल्या गेलेल्या आशिया कप २०२२ च्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी चा निर्णय घेतला.
रोहित शर्मा च्या अनुपस्तिथीत फलंदाजीस आलेल्या विराट ने राहुल सोबत दमदार सुरवात करत १० ओव्हर मध्ये पहिल्या विकेटसाठी 119 धावांची भागेदारी केली. भारतसंघाकडून के एल राहुल 62 धावा तर विराट कोहली नाबाद 122 धावा.करत टी २० मधील पहिले शतक ठोकले.
टी २० प्रकारातील आता पर्यंतचे सर्वात जास्त धावसंख्या असणारे विराटचे आज चे टी २० इंटरनॅशनल मधील पहिले शतक होते.
त्या नंतर आलेल्या सूर्यकुमार यादव ने ६, तर रिषभ पंत ने २० धाव करत भारताला मजबूत पकड बनवून दिली.
अफगाणिस्तान कडून फराद मलिक ने २ विकेट घेतल्या. तर संघाचे प्रमुख गोलंदाज राशिद खान सह अपयशी ठरले. खेळाचे पहिले सत्र संपले तेव्हा भारत २१२ वर ५ बाद अशी विशाल धावसंख्या उभारली.
आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामना हा ११ सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुबई इथे रंगणार आहे.