काही केल्या वजन वाढत नाहीये ? मग करा हे रामबाण उपाय.

बारीक व्यक्ती म्हटल्यावर लोकंच काय आपले सवंगडी एका वेगळ्याच दृष्टिने बघतात. काही तर खिल्ली देखील उडवतात. आपण काही केल्या वजन वाढवण्यास अयशस्वी ठरतो. काही अश्यावेळी काही सुचत नाही. आणि  शेवटी रासायनिकरीत्या बनवलेले वेट गेन प्रॉडक्ट्सकडे वळतो. परंतु अश्या पद्धतीने वजन वाढवणे हे अत्यंत शरीरास अपायकारक आणि चुकीचे आहे. जसं अती वजन वाढणं शरीरासाठी घातक असतं, त्याचप्रमाणे वजन कमी असणंसुद्धा शरीरासाठी फायद्याचं नसतं. वजन कमी असल्यामुळं बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा कमी वजन आजारपणाला निमंत्रणही देतं. कारण, शरीरात पोषक तत्त्वांचा अभाव असल्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. तर मग वजन वाढवण्यासाठी काय करावं हा प्रश्न अनेकांना पडून हैराण करत असेलच. मग वेळ ना गमावता चला तर बघुयात तुमच्यासाठी काही खास टिप्स.

Weight gain tips for Women

 

गुणकारी अश्वगंधा –

 

वजन वाढीसाठी अश्वगंधा हा रामबाण उपाय मानला जातो. अश्वगंधा हे एक आयुर्वेदिक औषध आहे. ज्यामुळे तुमचं वजन वाढण्यास मदत होते. एक ग्लास गरम दुधामध्ये अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी ते प्या. तुम्हाला आवडत असल्यास त्यामध्ये एक छोटा चमचा मध मिक्स करा. नियमित स्वरुपात अश्वगंधाचे सेवन केल्यास काही दिवसांमध्ये तुम्हाला वजन वाढल्याचं जाणवेल. तणावामुळे तुमचे वजन घटत जाते. अश्वगंधा तुमच्या शरीरातील ताणतणाव कमी करण्याचं काम करते. याव्यतिरिक्त तुमच्या पचन संस्थेच्या समस्याही सुटतात. ज्यामुळे तुम्हाला भूक लागण्यास मदत होते.

 

कॅलरीचं प्रमाण वाढवा- 

 

वजन वाढवण्यासाठी शरीरात कॅलरीचं प्रमाण वाढवणं अतिशय महत्त्वाचं. तुम्ही जर दिवसाला २१०० किलो कॅलरी घेता, तर त्यामध्ये साधारण १००० किलो कॅलरी वाढवू शकता. असं करण्यासाठी आहारात बीट, मुळा, मोड आलेली कडधान्य, डाळींब अशा पदार्थांचा समावेश करा. 

 

सुका मेवा – 

 

समावेश करा. विशेषतः अंजीर आणि काळ्या मनुक्याचं सेवन वाढवा. सहा सुकलेले अंजीर आणि जवळपास ३० ग्रॅम काळे मनुके रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर भिजवलेले अंजीर आणि मनुके खा. जवळपास २० ते ३० दिवसांमध्ये तुम्हाला वजनामध्ये फरक झाल्याचे जाणवेल. अंजीर आणि मनुक्यांमध्ये कॅलरीचे प्रमाण अधिक असते. काळ्या मनुक्यांमुळे पचनासंबंधीचे आजार देखील कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपली भूकही वाढते.

 

नारळाचं तेल –

 

नारळाचं तेल वजन वाढवण्यासाठी फायद्याचं ठरतं. त्यामुळं जेवण नारळाच्या तेला तयार करण्यास सुरुवात करा. 

 

योग्य व्यायाम – 

 

सूर्यनमस्कार हा वजन वढवण्यामागील अत्यंत प्रभावी उपाय आहे. त्यामुळे रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्यास संपुर्ण शरीर गरम होतो. कार्यशील शरीर बनून पटकन भूक लागते. खरंतर खाण्याच्या सवयी बदलण्यासोबतच वजन वाढवण्यासाठी आणि योग्य पातळीवर आल्यानंतर ते नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामही तितकाच महत्वाचा. आणखी काही योगासन आणि व्यायाम केल्यामुळं तणाव दूर होतो. त्याला ध्यानधारणेची साथ मिळाल्यास याचे सकारात्मक परिणाम शरीरावर दिसून येतात. 

 

गाजराचा ज्यूस –

 

वजन वाढवण्यासाठी अनेकदा गाजराचा ज्यूस पिण्याचा सल्ला देण्यात येतो. यामुळं आतड्यांमधीय एंन्झाईम्स सक्रिय होतात. यामुळं शरीरात न्यूट्रिएंट्स योग्य पद्धतीनं शोषून घेतले जातात. 

 

स्निग्ध पदार्थांचा जास्त वापर –

 

वजन वाढवण्यासाठी आहारामध्ये जास्त दुग्धजन्य आणि स्निग्ध पदार्थांचा समावेश करणं फायद्याचं ठरेल. तूप, दही, दूध, पनीर, लोणी, चीज तत्सम पदार्थ यामध्ये चांगला पर्याय ठरतात.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts