सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होणारा अर्शदीप सिंग कोण ?

अर्शदीप सिंग चा ५ जन्म फेब्रुवारी १९९९ मध्ये मध्यप्रद्देश येथील गुना येथे झाला.

७ जुलै २०२२ इंग्लड विरुद्धच्या सामन्यात टी २० इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये पदार्पण केले.

या सामन्यात भारताकडून खेळताना ३.३ ओव्हर मध्ये  केवळ १८ धावा देत २ विकेट घेतल्या. आणि विशेष म्हणजे १ ओव्हर निर्धाव सुद्धा दिले

टी २० मधील आता पर्यंतच सर्वोत्तम प्रदर्शन ३/१२ वेस्टइंडीज विरुद्धच्या सामन्यातील आहे. या सीरिज मध्ये ५ सामन्यात ७ विकेट घेत मालिकावीर नावाने सन्मानित झाला.

अर्शदीप सिंगने भारताकडून खेळताना आता पर्यंत ९ टी २० सामने खेळले असून १३ विकेट घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाकडून १९ एप्रिल २०१९ ला राजस्थान रॉयल विरुद्ध खेळताना पदार्पणाच्या सामन्यात सुद्धा महत्वाच्या विकेट्स मिळवत २/४३ अशी कामगिरी केली.

आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना ३७ सामने खेळले असून ४० विकेट  त्याच्या नावावर आहेत.

आशिया चषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला . या सामन्यात भारत संघाचा युवा खेळाडू अर्शदीप सिंगकडून चुकीने एक झेल सुटला.

१८. ३ व्या ओव्हर मध्ये  रविबिश्नोई च्या गोलंदाजीवर अर्शदीप सिंगने असिफ अलीचा झेल सोडला . तेव्हा असिफ अली शुन्यावर होता.

पण नंतर मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये अर्शदीप सिंग ने कसून गोलंदाजी करत पाकिस्तान ला विजयासाठी ५ व्या चेंडू पर्यंत तड्फवले.

सुटलेला झेल वगळला तर अर्शदीप सिंगने ३.५ ओव्हर मध्ये केवळ २७ धावा देत १ विकेट घेतली. आपली जबाबदारी पार पडली होती.

विराट कोहलीचा हा विक्रम माहित नसेल, तर जाणून घ्या !