आयुर्वेदामध्ये जांभूळ (Syzygium cumini ) हे अतिशय महतवाची आयुर्वेदिक वनस्पती असून ती मधुमेह,दमा,अळी संक्रमण,अतिसार खोकला आणि सर्दीचा उपचार यासाठी तिचा उपयोग केला जातो.
हंगामी फळ जांभूळ हे खायला अगदी गोड आणि चविष्ट असून ते आपल्या आरोग्याला बरेच फायदेशीर आहे. जांभूळ याचे वज्ञानिक नाव सिजीगियम क्युमिनी (Syzygium cumini ) आहे .
जांभूळ ही वनस्पती मूळ भारताची असून याचा विस्तार आपल्याला बिहार,ओडिसा या संपूर्ण गंगेच्या मैदानावर वितरित केलेला बघायला मिळते.
जांभूळ खाल्याने होणारे विशेष फायदे.
मधुमेह ला आटोक्यात आणण्यासाठी जांभूळ हे अतयंत उपयोगी आहे. जांभळाच्या बियांची भुकटी किंवा पावडर मधुमेहावर फायदेशीर ठरते.
पचनक्रियेत जामुळं हे अतिशय फादेशीर ठरते जांभूळ खाल्याने आपल्या पोटाशी निगडित असलेलं बरेच त्रास दूर होतात.
मूतखडा आजारावर जांभूळ हे फायदेशीर ठरते . जांभळाच्या बियांची भुकटी करून पाणी किंवा दह्याबरोबर घेतल्याने मुतखडा आटोक्यात आणण्यास मदत मिळते