सध्या पावसाळा सुरू आहे. आणि पावसाळा म्हटलं की त्यात चिंब होऊन भिजले नाही असं होणार नाही. अशातच जर छान मुसळधार पाऊस असेल तर त्यात मनमुराद भिजल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही.
आलूबुखारा हे एक स्वादिष्ट आणि चविष्ट असे फळ आहे. पावसाळ्यात इंफेक्शन आणि पोटाशी संबंधित तक्रारींपासून दूर राहण्यासाठी याचे सेवन अवश्य करावे. रोज आलूबुखारा खाल्ल्याने इम्यून सिस्टम मजबूत होतो.
फायबरयुक्त असलेले नास्पती हे फळ खूपच गोड आणि मधूर असे फळ आहे. याने मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले होते. यात अँटी ऑक्सीडेंट्स मात्रा जास्त असते. त्यामुळे तुम्ही जर आपले वजन कमी करु इच्छिता तर नास्पतीचे सेवन अवश्य करा.
पावसाळ्यात आजारापासून बचाव करण्यासाठी रोज डाळिंब खाल्ले पाहिजे. फायबर आणि व्हिटामिन ने युक्त असलेल्या डाळिंबाचे सेवन तसे वर्षभर करता येते मात्र पावसाळ्यात डाळिंबाचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित काही तक्रारी असतील तर दूर होतात.