तुमचं Facebook अकाउंट झालं हॅक ? मग असं करा पुन्हा रिकव्हर.

तुमचं Facebook अकाउंट हॅक झालयं ? अशी तुम्हाला शंका आहे ? किंवा दुसरं कोणीतरी तुमचे Facebook अकाउंट वापरतय असं जाणवतंय ? जर तुम्हाला असं वाटत असेल, तर या पद्धतीने तुम्ही तुमचं फेसबुक अकाउंट रिकव्हर करू शकता.

Image by unsplash

जर तुमचं Facebook अकाउंट हॅक झालं असेल असं तुम्हाला वाटत आहे , तर सर्वप्रथम तुम्ही काय करायला हवं? तुमचं Facebook अकाउंट पुन्हा कसं वापरता येईल हे सर्व प्रश्न तुम्हाला पडले असतील तर चिंता करण्याची गरज नाही.

Image by unsplash

तुमचं फेसबूक अकाउंट जर हॅक झालं असेल किंवा कुणीतरी दुसरं व्यक्ती वापरात असेल तर, तुम्हाला तुमच्या Timeline पेजवर अश्या काही गोष्टी दिसतील ज्या तुम्ही कधीही पोस्ट करत नाही. 

तुमचं अकाउंट हॅक झालं की नाही हे कसं कळणार ?

Image by unsplash

तुमच्या Messenger मध्ये स्पॅम मेसेज DM मध्ये दिसू लागले, चुकीचे फोटो, लिंक किंवा व्हिडिओ जे तुम्ही पाठवले नाहीत अश्या गोष्टी दिसू लागतील.

Image by unsplash

याव्यतिरिक्त , तुम्हाला Facebook तर्फे एसएमएस किंवा ईमेलद्वारे एक मेसेज देखील मिळेल की तुमचं अकाउंट एखाद्या अनोळखी ठिकाणावरून (Unknown Location ) चालवलं जात आहे . जसं की तुमचं अकाउंट दुसऱ्या देशातून किंवा राज्यातून अ‍ॅक्सेस केलं जातयं.

Image by unsplash

अकाउंट हॅक केल्यानंतर हॅकर्स सर्वप्रथम तुमच्या अकाउंटचा पासवर्ड बदलतात. पण तरीही, तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये एन्ट्री करू शकत असाल तर मग तुम्हीं लगेच सेटिंग्जमध्ये जा आणि तुमचं Facebook अकाउंट अलीकडे कुठे उघडलं आहे ते तपासून घ्या आणि तुमचं अकाउंट सर्वत्र Logout करून घ्या.

Image by unsplash

1. सर्वात आधी फेसबुक अकाउंटचा पासवर्ड बदला. मोबाइल व डेस्कटॉप दोन्हीवर पासवर्ड बदला आणि निश्चित करा . 2. तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही लॉगिन Devices मधून अकाउंट सर्वत्र लॉगआउट करा. 3. आपल्या मोबाईलमधून संशयास्पद अ‍ॅप्लिकेशन तपास आणि ते Uninstall व Delete करा.

असं करा तुमचं हॅक झालेलं Facebook अकाउंट रिकव्हर…

Image by unsplash

तुमचं अकाउंट हॅक झाल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही Facebook सपोर्टशी संपर्क साधा आणि त्यांनी दिलेल्या सुचनांचं पालन करा जेणेकरून तुम्हाला तुमचं फेसबूक अकाउंट परत मिळू शकेल.

फेसबुक अकाउंट हॅक झाल्यास कुठे तक्रार करावी ?

Image by unsplash