जिओ आपल्या ग्राहकांसाठी खास प्लॅन आणलेला आहे.  यावेळी देखील Jio ने   3 GB डेटासोबत  Disney+ Hotstar ची सेवा जिओने आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. 

नव्या वर्षात टेलिकॉम कंपन्यांनी आपले दर वाढवलेले आहेत.असं असलं तरी देखील  Jio चे  दर वाढवूनही खिशाला परवडण्यासारखं असल्याचं अनेकांचं मत आहे.

एअरटेल किंवा वोडाफोनपेक्षा नक्कीच खिशाला परवडणारा प्लॅन जिओ देत असल्याचं काही युझर्सचं म्हणणं आहे.

त्यामुळे आपण जाणून घेऊया Jio चे  तीन सिक्रेट प्लॅन सांगणार आहोत ज्यामध्ये  3 GB डेटा आणि Disney+ Hotstar ची सुविधा मिळणार आहे. 

प्लॅन  419 रुपये  

या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3GB इंटरनेट मिळेल. या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 84GB डेटा मिळेल.

419 च्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील मिळेल, या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. 

प्लॅन  619 रुपये  

या प्लॅनमध्ये  ग्राहकांना  6 GB अतिरिक्त डेटा वापऱण्यासाठी मिळणार असून प्लॅनची वैधता 28 दिवस असणार आहे.

619 च्या या प्लॅनमध्ये 3 GB डेटा अनलिमिटेड कॉलिंगची आणि 100 SMS मिळणार तसेच  ग्राहकांना Disney + Hotstar VIP आणि जिओ एप्स चे  सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

प्लॅन  1199 रुपये  

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळणार. या प्लॅनमध्ये, तुम्हाला दररोज 3GB डेटाच सोबत, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील मिळेल.

1119 रुपयांच्या  या  प्लानमध्ये  ग्राहकांना  Jio Cloud, Jio Cinema आणि Jio TV सारख्या सर्व Jio Apps चे  सबस्क्रिप्शन मिळणार.

अतिरिक्त माहितीसाठी My Jio हे  App वापरा .