केएल राहुल आणि अथिया शेट्टी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

पुढील वर्षी जानेवारी 2023 मध्ये हे जोडपे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

भारतीय क्रिकेटचा सलामीवीर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी यांच्या लग्नाची उत्सुकता जोरात सुरू आहे.

टी-२० वर्ल्ड कपनंतर त्यांचे लग्न होणार आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, हे कपल महाराष्ट्रात लग्नगाठ बांधणार आहे.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी एकाच घरात शिफ्ट झाले आहेत.

लग्नापूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

सुनील शेट्टीच्या शेवटच्या वक्तव्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की,करिअरमधून वेळ मिळाल्यावरच लग्नाची तयारी केली जाईल.