अरबाज खानच्या या सवयीमुळे मलायका झाली होती त्रस्त.
अभिनेता अरबाज खान सोबत विभक्त झाल्यानंतरही अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमी तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असते.
अर्जुन कपूर आणि मलायका सोबतचे फोटो आणि विडिओ नेहमीच सोशल मीडिया वर व्हायरल होताना आपणास दिसतात. ते दोघेही बऱ्याचदा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात.
२०१७ साली अरबाज आणि मलायकाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र,ते वेगळे का झाले याबद्दल त्यांनी कधी सांगितले नाही. पण त्यांच्यातील मतभेदांबद्दल बऱ्याचदा सांगितले आहे
एकदा मलायका अरोराने एका शोमध्ये म्हटले होते की, ती अरबाजच्या एका सवयीमुळे त्रस्त झाली आहे आणि त्याची ही सवय दिवसेंदिवस जास्त बिघडत आहे.
फराह खानचा भाऊ साजिद खानला मलायका अरोरा आणि अरबाज खानने मुलाखत दिली होती. त्यावेळी मलायकाला अरबाजच्या वाईट सवयींनबद्दल साजिद ने विचारले होते.
मलायका म्हणाली की, जर वाईट सवयीबद्दल सांगायचे तर अरबाज खूप बेफिकिर आहेत आणि ही गोष्ट दिवसेंदिवस वाढते आहे.
आणखी सेलिब्रिटी माहिती व फोटो बघण्याकरीत वेबसाईट ओपन करा