बऱ्याचदा आपल्याला  नेटवेर्कशी संबंधीत समस्यांना तोंड द्यावं लागतं. बऱ्याचदा असं की होतं की, फोनमधील नेटवर्क अचानक गायब होतं आणि बरेच  प्रयत्न केले  तरी फोन लावताना समस्यांचा सामना करावा लागतो.

अशावेळी आपल्याला वाटते की, आपला फोन खराब तर झालेला नाही ना? परंतु प्रत्येक वेळी खराब नेटवर्कचे कारण तुमचा फोन नाही, तर खराब हवामान किंवा सेल टॉवरची कमतरता देखील असू शकतो.

परंतु अशावेळी काय करावे? असा  प्रश्न पडतो, तर आज आम्ही तुम्हाला यावर काही मार्ग सांगत आहोत.

फ्लाईट मोड हा एक सोपा आणि जलद पर्याय आहे. हा पर्याय 99 टक्के काम करेल. फोन थोड्या वेळ फ्लाईट मोड मध्ये ठेऊन परत सुरू केल्याने तुम्हाला एक चांगले नेटवर्क मिळेल.

1.फ्लाईट मोड

फोन रीस्टार्ट करणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. संगणकाप्रमाणेच, तुम्ही स्मार्टफोन रीस्टार्ट करून नेटवर्क समस्येचे निराकरण करू शकता

2.फोन रीस्टार्ट करणे

सिम कार्ड काढणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. जर तुमच्या फोनला चांगले नेटवर्क मिळत नसेल, तर तुम्हाला स्मार्टफोनमधून सिम कार्ड काढून तो परत घालावा  लागेल. 

3.सिम कार्ड काढणे

काहीवेळा तुम्हाला चांगल्या नेटवर्कसाठी सेटिंग बदलावी लागेल. तुम्ही Android वापरकर्ता असल्यास, तुम्हाला  Settings > General > Reset > Reset Network Settings वर जावे लागेल. हे केल्यानंतर तुमचा फोन रीसेट करा.

4.नेटवर्क सेटिंग्ज