स्मार्टफोन हा आजच्या काळात आपल्या अविभाज्य भाग बनला आहे. फोनशिवाय काही काळ जगणेसुद्धा  कठीण आहे.

आपण अनेक वैयक्तिक गोष्टी आणि कागदपत्रे मोबाईलमध्ये जतन करून ठेवतो. यासोबतच मोबाइल बँकिंग आणि बँक खात्याशी संबंधित माहितीही  मोबाइलमध्ये सेव करतो .

तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता. कारण स्मार्टफोनमध्ये असलेल्या बँक डिटेल्सचा वापर करून चोर तुमच्यासोबत फसवणूक करू शकतात.

मोबाईल हरवल्यास होणारी फसवणूक टाळण्याकरिता आज आम्ही तुम्हाला  टिप्स सांगत आहोत.

सिम कार्ड त्वरित ब्लॉक करा.

1

सर्वप्रथम तुमचे सिम कार्ड ब्लॉक करा. जेणेकरून फोन चुकीच्या हातात गेला असेल आणि तुमच्या बँक तपशील सोबत  छेडकाणी  केली जात असेल तर सिमवर ओटीपी पोहोचणार नाही.

Cross

मोबाइल बँकिंग ब्लॉक करा

2

लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही फोनच्या मदतीने तुम्ही तुमची बँक खातं  ब्लॉक करा. जेणेकरून कोणीही तुमच्या खात्याचा गैरवापर करू शकणार नाही. आपण बँकेला कॉल करून खाते बंद करू शकता.

मोबाइल वॉलेटचा एक्सेस ब्लॉक करा

3

फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास बँक खात्यासोबत  मोबाईल वॉलेटमधील एक्सेस ब्लॉक करा. कारण तुम्ही ते अनेक ठिकाणी पेमेंटसाठी वापरता त्याचा चोर गैरवापर करू शकतो. 

CEIR पोर्टलवरून फोन ब्लॉक करा

4

तुम्ही सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) पोर्टलद्वारे चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाइल ब्लॉक करू शकता. यासोबतच त्याच्या मदतीने फोन ट्रॅकही करता येतो.

पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवा 

5

जर तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल किंवा हरवला असेल तर तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवा , जेणेकरून कोणी त्याचा गैरवापर करत असल्यास तुमचे नुकसान होणार नाही.

आणखी माहिती बघण्याकरिता वेबसाइट ओपन करा.