Google वर 'या' 5 गोष्टी कधीही सर्च करु नका ! नाही तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही चुकूनही गुगलवर सर्च करू नका, नाही तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

Google हे सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे आणि म्हणूनच गुगलचा सर्वात जास्त वापर केला जातो. 

कोणत्याही विषयाबद्दल जाणून घेण्यासाठी, बहुतांश लोक Google वापरतात. 

पण तुम्हाला माहित आहे का की गुगलवर जर तुम्ही या काही गोष्टी सर्च केल्याने तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही गुगलवर काही सर्च करता तेव्हा काळजीपूर्वक सर्च करा.

भारत सरकार चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत अतिशय कडक आणि संवेदनशील आहे. गुगलवर चाइल्ड पॉर्न सर्च करणं, पाहणं किंवा शेअर करणं हा गुन्हा आहे. यासंबंधीच्या कायद्यांचे उल्लंघन केलं तर तुरुंगवास होऊ शकतो.

चाइल्ड पोर्नोग्राफी

अनेकदा लोक गुगलवर अशा गोष्टी सर्च करतात, ज्याचा त्यांच्याशी काहीच संबंध नसतो. बॉम्ब कसा बनवायचा? यांसारख्या संशयास्पद गोष्टी कधीही गुगलवर सर्च करु नका. कारण, या कामांवर सायबर सेलकडून लक्ष ठेवलं जातं. सुरक्षा एजन्सी तुमच्यावर कारवाई करू शकते.

बॉम्ब कसा बनवायचा 

गुगलवर गर्भपाताच्या पद्धती सर्च करणं देखील गुन्हा मानला जातो. भारतीय कायद्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपात करणं गुन्हा आहे.

गर्भपात कसं केल जात 

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ऑनलाइन लीक होणं देखील गुन्हा समजला जातो. जर तुम्ही कोणताही चित्रपट ऑनलाइन लीक किंवा डाउनलोड केला, तर तो मोठा गुन्हा आहे. भारत सरकारच्या या कायद्याचं उल्लंघन केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजार रुपये दंड होऊ शकतो.

चित्रपट पायरेसी

सोशल मीडिया किंवा गुगलवर कोणतेही खाजगी फोटो किंवा व्हिडिओ लीक करणं हा देखील गंभीर गुन्हा मानला जातो. यामुळे तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.

खाजगी फोटो आणि व्हिडीओ

आणखी फोटो आणि माहिती बघण्याकरिता वेबसाइट ओपन करा.