कोरोना महासाथीतून उसंत मिळत असतानाच आता केरळात ‘टोमॅटो फ्लू’ या नवीन आजाराने डोके वर काढले आहे. पाच वर्षांखालील मुलांना या विचित्र आजाराची लागण होत असल्याचे आढळून आले आहे.
टोमॅटो फ्लू कशामुळे होतो, याचा कोणताही तपास अद्याप लागलेला नाही. वैद्यकीय तज्ज्ञांनाही या आजाराची कारणे शोधण्यात यश आलेले नाही.
टोमॅटो फ्लूमध्ये चिकुनगुनिया सारखीच काही लक्षणे असतात, जसे की खूप ताप, अंगदुखी, सांधे सुजणे, थकवा. तथापि, संक्रमित मुलांना पुरळ आणि त्वचेची जळजळ देखील होते.
टोमॅटो फ्लू संसर्गजन्य असल्याने, रोगाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमित व्यक्तीशी जवळचा संपर्क टाळला पाहिजे.
संक्रमित मुलांनी स्क्रॅचिंग रॅशेस किंवा फोड टाळावे कारण यामुळे ते आणखी वाढेल विशेषत: साधारण: ५ वर्षाच्या जवळपास असणाऱ्या लहान मुलांना हा आजार होत असल्याचे आढळून आले आहे