व्हॉट्स ॲप फीचर्समध्ये होतील आता हे बदल

Whatsapp Features 2022: व्हॉईस मेसेज मध्ये केला जाणार हा बदल. आता अधिक मजेशीर बनेल व्हॉईस मेसेज. जाणून घ्या खासियत

काय आहे हा नवीन फिचर ?

इन्स्टंट मेसेजिंग ॲप आपल्या प्लॅटफॉर्मवर व्हॉइस मेसेजेससाठी अनेक नवीन फीचर्स समाविष्ट करणार आहे. या फीचर्समुळे युजर्सना अधिक चांगला एक्सपीरियन्स मिळेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

 

WhatsApp Upcoming Features 2022: व्हॉट्सॲप (WhatsApp) मध्ये सतत नवीन फीचर्स जोडले जातात. हा इन्सटंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म सातत्याने युजर्सच्या मागण्या आणि गरजेनुसार अपडेट होत असतो. त्यामुळेच गेली अनेक वर्ष हे ॲप जगभरात सर्वाधिक डाऊनलोड केलं जाणारं आणि वापरलं जाणारं ॲप ठरलं आहे. आता या प्लॅटफॉर्ममध्ये आणखी एक फीचर समाविष्ट केलं जाणार आहे. आता कंपनीला व्हॉईस मेसेज (Voice message) हे फीचर अधिक आकर्षक बनवायचं आहे. मेटाच्या मालकीच्या या मेसेजिंग ॲपमध्ये सध्या मेसेजेसवर इमोजी रिॲक्शन (Emoji Reactions) या फीचरवर काम केलं जात आहे. या लोकप्रिय मेसेजिंग ॲपमध्ये अनेक नवीन बदल पाहायला मिळणार आहेत, त्यापैकी एक पोल फीचर्स (Poll Filters) आणि मल्टी-डिव्हाइस सपोर्ट असेल. पण नवीन फीचर्स इथेच संपणार नाहीत, तर व्हॉईस मेसेजिंगलाही अधिक मजेदार बनवण्यासाठी कंपनी काही नवीन फीचर्स देण्याच्या विचार करत आहे.

 

व्हॉईस मेसेजिंग अंतर्गत येणाऱ्या नवीन फीचर्समध्ये यूजर्सना ड्राफ्ट प्रिव्ह्यू, पॉज आणि रेज्यूम रेकॉर्डिंगचा पर्यायदेखील मिळेल. यासह, चॅट प्लेबॅकच्या बाहेर, प्लेबॅक पुन्हा सुरू करणे (रेज्यूमिंग प्लेबॅक) आणि वेव्हफॉर्म देखील सुधारले जातील.

 

2013 ची नाविन सुरुवात

व्हॉट्सअॅपवर व्हॉईस मेसेज पाठवणे 2013 मध्ये सुरू झाले होते आणि कंपनीने त्यानंतर या फीचरवर फारसं लक्ष दिलं नव्हतं. आता या प्लॅटफॉर्मवर दररोज सुमारे 7 बिलियन व्हॉईस मेसेज पाठवले जातात. त्यामुळे हे हे मेसेजिंग अॅप आणि त्यातलं हे व्हॉईस मेसेजिंग फीचर किती लोकप्रिय होत आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो आणि म्हणूनच कंपनीने आता यावर लक्ष केंद्रित केलं आहे आणि लवकरच कंपनी यात अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट्स समाविष्ट करु शकते. कंपनीने त्यासाठी काम करणं सुरु केलं आहे.

 

अशी असेल फीचर मध्ये सुधारणा

चॅटमधून बाहेर पडल्यानंतरही युजर्स आता व्हॉइस मेसेज ऐकू शकतात. लवकरच युजर्सना व्हॉईस मेसेजच्या खाली पॉज आणि रिझ्युमचा पर्याय दिसेल, जो चॅटच्या बाहेरही उपस्थित असेल. तसेच, वेव्हफॉर्म व्हिज्युअलायझेशन अंतर्गत, युजर्सना व्हॉइस मेसेज ऐकण्याचा चांगला अनुभव मिळेल. हे सर्व आगामी फीचर्स स्टेबल व्हर्जनसाठी लवकरच रोलआऊट केले जातील.

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts