मेटाव्हर्स (Metaverse) म्हणजे काय ? फेसबुकचे नवीन नाव Meta । What is Metaverse?

फेसबुकने आपले नाव बदलून मेटा (Meta) झाल्याची घोषणा केली. मेटाव्हर्स हे इंटरेनेटचं भविष्य असेल असे  अनेकांचे  म्हणणे आहे . फेसबुक कंपनीचे  नाव बदलून मेटा (Meta) झाल्याची घोषणा  कंपनीच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये ही  करण्यात आली. मात्र हे नेमकं मेटाव्हर्स  काय आहे ज्याची सगळीकळे सुरु आहे चर्चा ते आपण जाणून घेऊया . 

 

‘मेटाव्हर्स’ (Metaverse) काय आहे?

 

‘मेटाव्हर्स’ (Metaverse) हे नाव एकूण ते व्हर्च्युअल रिएलिटी (Virtual Reality) शी निगळीत  आहे असे दिसून येते . अनेकांची अशी समजूत बसेल कि हि कदाचित ही  व्हर्च्युअल रिएलिटी VR  (Virtual Reality) ची सुधारित आवृत्ती आहे आणि हे इंटरनेट चे असणारे पुढील भविष्य असेल . 

 

मात्र मेटाव्हर्स म्हणजे व्हर्च्युअल रिएलिटीद्वारे उभं करण्यात आलेलं असं जग आहे कि जिथे तुमचा एक डिजिटल अवतार असेल आणि कम्प्युटरने निर्माण केलेल्या या जगाचा इतर युजर्ससोबत तुम्ही अनुभव घेऊ शकाल. म्हणजे यात तुम्ही  कॉम्प्युटरऐवजी एखादा हेडसेटवापरून  व्हर्च्युअल रिएलिटीद्वारे तुम्ही या मेटाव्हर्सचा अनुभव घेऊ शकाल, हे हेडसेट तुम्हाला सगळ्या प्रकारचे डिजीटल अनुभव असणाऱ्या एका व्हर्च्युअल वर्ल्ड शी जोडेल .

सध्या व्हर्च्युएल रिएलिटी (Virtual  Reality ) म्हणजेच VR चा वापर हा जास्त गेमिंगसाठी केला जातो  पण मेटाव्हर्स  याचा वापर मात्र काम, टाईमपास,सिनेमा , कॉन्सर्ट्स,  यासाठीही करता येईल तसेच मेटाव्हर्स  चा वापर अभ्यास व  शैक्षणिक 3D ट्युटोरिअल (tutorial ), रिसर्च आणि  इतर मजामस्ती करण्यासाठी वापरता येईल.

 

या मेटाव्हर्सची अजून नेमकी अशी एक व्याख्या नाही. पण यामध्ये तुमचं प्रतिनिधित्वं करणारा तुमचा एक 3D अवतार असेल ज्याचा फायदा फक्त गेमिंग नाही तर इतर गोष्टींसाठीही  करता येईल. 

 

Facebook कंपनी चे  नाव बदलून ते Meta का करण्यात आले ?

 

फेसबुक कंपनीचे  नाव बदलून मेटा (Meta) झाल्याची घोषणा  कंपनीच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये ही  करण्यात आली ‘या नवीन नावामुळे कंपनी ज्या क्षेत्रात कायम करत आहे आणि ज्या सेवा पुरवत आहे, त्याबद्दलची कल्पना अधिक स्पष्ट होईल’ असा विचार या वेळी मांडण्यात आला.

 

‘फेसबुक एका नव्या अध्यायाला सुरुवात करत आहे व इंटरनेट क्षेत्रासाठी आणि फेसबुक  कंपनीसाठी हा एक नवा अध्याय असेल ‘असं मार्क झकरबर्ग यांचे म्हणणे आहे. 

 

याआधी, मेटाव्हर्स (Metaverse) विकसित करण्यासाठी युरोपात 10 हजार जणांची नियुक्ती करणार असल्याचं फेसबुकने जाहीर केलं होतं. 

सध्या मोठ्या टेक कंपन्या आणि श्रीमंत गुंतवणूकदारांमध्ये मेटाव्हर्सबद्दल प्रचंड उत्सुकता आहे आणि जर  हे इंटरनेटचं भविष्य असेल तर आपण त्यात मागे राहू नये, असा फेसबुक , गूगल  यांसारख्या सगळ्यांच  बड्या कंपन्यांचा  प्रयत्न आहे.

 

 शिवाय VR (Virtual Reality)  वापरून सुरू असलेलं ऍडव्हान्स  गेमिंग आणि कनेक्टिव्हिटीमध्ये होत असलेली सुधारणा यामुळे टेक्नॉलॉजीतल्या या नवीन पुढच्या टप्प्याच्या आपण अगदी जवळ असल्याचं म्हटलं जातंय.

Editorial Team: Editorial Team By MarathiShout Publication
Recent Posts