कोजागिरी पौर्णिमेचे रहस्य काय ? आरोग्यास उत्तम शरद पौर्णिमा करा साजरी.

आश्विन पौर्णिमेला २०२२ कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणतात. येत्या रविवारी दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. आश्विन महिन्यात पावसाळा संपून गेल्याने आकाश निरभ्र असतं. शरद ऋतूची किंचित गारवा असलेली रात्र असते. आकाश मोकळे होऊन चंद्राचे पिठूर चांदणं पडतं. आणि या प्रकाशात मन प्रसन्न करणारा येणाऱ्या सणासुदीच्या आनंदाची चाहूल देणारा चंद्राचा प्रकाश सर्वत्र पसरलेला असतो. अर्थातच कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागरण. पण या दिवशी चंद्रप्रकाशात ठेवलेलं मसाला दूध पिणं आणि जागरण करणं यामागे काय आहे शास्त्र ते आज आपण जाणून घेणार आहोत. मग चला तर वेळ न गमावता सुरुवात करुयात अरोग्यापासून. 

 

आरोग्यपूरक प्रथा

 

कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात खूप मोठे स्थान आहे. आणि कोजागिरी पौर्णिमेला जागरण करणे हे या दिवसासाठी खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी केशरी मसाला दूध, पोहे, नारळपाणी देण्याची पद्धत आहे. या प्रथेमागे आरोग्यरक्षणाची संकल्पना आहे. शरद ऋतूमध्ये अशा पदार्थांची शरीराला गरज असते. म्हणूनच ही प्रथा आरोग्यास उपयुक्त असते. 

 

कोजागिरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये मध्यरात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्र देवाची पूजा केली जाते. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी देवी चंद्रलोकातून भूतलावर अवतरते. आणि जागरण करणाऱ्या लोकांवर आपली प्रसन्नता व आशीर्वाद बरसवते. आणि सर्वांना उत्तम आरोग्य व धनसंपत्ती लाभो असा आशीर्वाद देते.

 

या दिवसाला देवी ‘को जागर्ति ‘ असं विचारते, असं मानतात. या दिवशी देवी कोण जागा आहे, असे देवी विचारते आणि नकळत त्या जागृत आहे त्याच्यावर देवी प्रसन्न होते. ‘को गर्ति ‘ याचा अर्थ केवळ कोण जागरण करत आहे असा नसून तर शरीराची, घराची आणि परिसराची स्वचछता पाळण्यात, आरोग्याची काळजी घेण्यात, कर्तव्याचे पालन करण्यात कोण जागरुक आहे, असा आहे. लक्ष्मी देवी आपल्या समाधानाची देवता आहे. त्यामुळे तिला खूश ठेवण्यासाठी आधी आरोग्याकडे, मानसिक प्रसन्नतेकडे लक्ष द्यायची आवश्यकता आहे.

 

लक्ष्मीची पूजा का करावी ?

 

शरद पौर्णिमा हा देवी लक्ष्मीचा प्रकट दिवस मानला जातो. असे म्हटले जाते की याच दिवशी देवी लक्ष्मी समुद्र मंथनातून उत्पत्ती झाली. त्यामुळे या दिवशी नारायणसोबत देवी लक्ष्मीची पूजा करावी.

 

शास्त्रीय कारण

 

वास्तविक, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. अशा स्थितीत चंद्राच्या किरणांचे रासायनिक घटक पृथ्वीवर पडतात. अशा परिस्थितीत जर खीर संपूर्ण रात्र चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवली गेली तर ते घटक खीरमध्ये शोषले जातात. या रासायनिक घटकांमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे इत्यादी असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ही खीर खाल्ल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्याला त्वचा रोग, कफ संबंधित विकार आणि श्वसनाशी संबंधित समस्यांपासून स्वातंत्र्य मिळते. असे मानले जाते की जर ही खीर चांदीच्या भांड्यात ठेवली तर त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात. त्यामुळे जर तुम्ही जागरण करत नसाल किंवा ही पौर्णिमा साजरी करत नसाल तर यावर्षी आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी या शरद पौर्णिमेचा नक्की लाभ घ्या. आणि इतरांना देखील सांगा. 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts