मोबाईलसकट सिम कार्ड हरवलाय ? तर असा करा सिम ब्लॉक.

आपल्या नावाने कोणी सिम कार्ड चालवत तर नाहीये ना ? हा प्रश्न अनेक जणांना कित्येकदा पडला असेल. अनेकदा नवीन सिमकार्ड घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड किंवा पासपोर्ट अशा डॉक्यूमेंटची गरज असते. बरेचदा आपल्याला असे वाटते की आपल्या नावावर दुसरे सिम कार्ड कोणी वापर करत नाही ना ? आता असे वाटले तर काळजी करण्याचं काम नाहीये. कारण तुम्ही एका मिनिटांमध्ये तुमच्या नावावर किती सिम कार्ड एक्टिव आहेत ते माहिती करु शकतात ते कसे चला आपण जाणून घेऊया.

 

तसेच काहीवेळेस मोबाईल फोन हरवल्यानंतर नवीन सिम मिळते. ते जुन्या सिमची काळजी घेत नाहीत. जर तुमचे जुने सिम तुमच्या card आधार क्रमांकाशी लिंक झाले असेल आणि त्यातून काही गैरप्रकार घडत असतील तर तुमच्या आधार लिंकमुळे तुम्ही पोलिसांच्या चौकशीत किंवा तपासातही येऊ शकताय म्हणूनच तुमच्या आधारशी किती मोबाईल सिम लिंक आहेत हे एकदा तपासणे आणि तुम्ही वापरत नसलेले सिम बंद करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की कोणीतरी तुमचा आयडी वापरून सिमकार्ड विकत घेतले आहे आणि ते वापरत आहे. तर तुम्ही आता त्याची माहिती ऑनलाइन मिळवू शकता.  एवढेच नाही तर ती सिमकार्डही तुम्ही ब्लॉक करू शकता.

असे करा सिम ब्लॉक :-

  1. सर्वात आधी (https://tafcop.dgtelecom.gov.in/alert.php) या पोर्टलवर लॉगिन करा.
  2. यानंतर तुमचा नंबर टाका आणि पोर्टलवर OTP नमूद करा.
  3. आता तुम्हाला सक्रिय कनेक्शनची माहिती दिसेल.
  4. येथे वापरकर्ते अशा क्रमांकांना ब्लॉक करण्यासाठी विनंती पाठवू शकतात, ज्याबद्दल त्यांना माहिती नाही.
  5. रिक्वेस्ट केल्यानंतर, विभागाकडून एक तिकीट आयडी पाठवला जाईल जेणेकरून तुम्ही त्याचा मागोवा घेऊ शकता.
  6. हा नंबर काही आठवड्यात बंद होईल.

 

तर अश्याप्रकारे तुम्ही ही प्रक्रिया फॉलो केल्यास तुमच्या नावावर किती सिम रजिस्टर आहेत आणि किती सिमकार्ड तुम्हाला माहीत नाहीत हे तुम्ही सहज शोधू शकता. ही खूप महत्वाची माहिती आहे जी तुम्हाला आधी मिळू शकत नव्हती पण आता तुम्ही ही माहिती सहज मिळवू शकता. ही माहिती आता पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येकाला उपलब्ध झाली आहे.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts