WhatsApp मध्ये येतंय शानदार फिचर, आता अ‍ॅपचे तुमच्या आवडीनुसार बदलता येणार कलर !

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp कडून आपल्या युजर्सचा चॅटिंगचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सतत नवनवे फिचर्स आणले जातात. आता कंपनी अजून एक खास फिचर आणायच्या तयारीत आहे.

नवीन फिचरच्या मदतीने युजर्सना अ‍ॅपचे कलर्स आपल्या आवडीनुसार बदलता येणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅपशी निगडीत अपडेट ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo ने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. हे फिचर रोलआउट झाल्यानंतर युजर्स चॅट बॉक्सचा कलर चेंज करु शकतील, शिवाय स्क्रीनवर दिसणाऱ्या टेक्स्टचा कलरही बदलू शकणार आहेत.सध्या या फिचरवर कंपनीकडून काम सुरू आहे, पण याबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही असं WABetaInfo ने म्हटलंय.

दरम्यान, कलर चेंज फिचर कधीपर्यंत रोलआउट होईल याबाबत अजून माहिती आलेली नाही. या व्यतिरिक्त कंपनी येत्या काही आठवड्यात अजून काही नवीन फिचर्स आणण्याची शक्यता आहे. यात नवीन आलेल्या व्हॉइस मेसेज पर्यायाचा प्ले-स्पीड वाढवण्याचं फिचरही आहे. हे फिचर बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे, सध्या iOS साठीही हे फिचर डेव्हलप करण्याची तयारी सुरू आहे. व्हॉइस मेसेज पर्यायाचा प्ले-स्पीड वाढवण्याचं फिचर व्हॉट्सअॅपच्या व्हर्जन 2.21.60.11 मध्ये मिळेल असं समजतंय. मेसेजचा स्पीड बदलण्यासाठी युजरला 1x, 1.5x आणि 2x असे तीन पर्याय मिळतील. गरजेप्रमाणे कमी-जास्त स्पीडची निवड करता येईल

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts