स्कॅम 1992 : हर्षद मेहता या वेब सिराज च्या माध्यमातून आपण सर्वाना परिचत असलेले स्वामी. हे दुसरे कुणी नसून चंद्रास्वामी होय. ज्या पद्धतीने 1992 मध्ये शेयर मार्केट वर गेले, त्याच प्रमाणे खाली सुद्धा आले. या स्कॅम मध्ये चंद्रास्वामींचा हर्षद मेहताना पाठिंबा होता.चंद्रा स्वामी हे एक गूढ व्यक्तिमत्त्व असून याचा अंदाज यावरून घेऊ शकतो की त्यांची ओळख थेट इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे पर्यंत होती, अनेक कथित कारणामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अस काही रहस्यमय आहे, की साधे अध्यात्म ते राजकारण असा सामन्या पासून ते वरिष्ठ पदा पर्यंत च्या व्यक्ती वर चंद्रास्वामी ची जादू कायम होती.
कोण होते चंद्रास्वामी ?
डोक्यावर मोठा टिळा, वाढलेली दाढी त्यावर सफेत पानांची झाक, पिवळे भगवे कपडे आणि गळ्यात आणि हातात अलंकार यामुळे चंद्रास्वामी सामान्य माणसाला आकर्षित करुण घेत. त्यात ते कुंडली तसेच भविष्य वाणी करुण स्वतः भोवती वलय निर्माण करत.
चंद्रास्वामी चा जन्म जैन कुटुंबात झाला, त्यांना त्यांच्या बाळपणी जैन साधूंच्या सहवास लाभला ,लोक त्याना बालपनी हा मुलगा सन्यासी होणार म्हणत असत, शिक्षणही अगदी बेताच, तरी सुद्धा त्यांच्या प्रभाव भारत्याच्या राजकारनात होता, भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिम्हाराव याना सुद्धा चंद्रास्वामीशी मैत्री होती, चंद्रास्वामी थेट कोणतीही परवानगी न घेता नरसिम्हाराव च्या केबिन मधे जात.
अनेक राह्यस्य आणि गूढ
हस्तविद्या, तांत्रिक विद्या, आणि अध्यात्म याचा सुरेख संगम त्यानी करवून स्वयंघोषित आध्यातमिक गुरु ची त्यानी उपाधि लावून घेतली.
याची अनेक मोठी भक्त संख्या आहे.ब्रिटन च्या पंतप्रधान थेरेसा मेयाना सुद्धा चंद्रास्वामीनि ताईत बांधवायला लावलं होत.
वादग्रस्त ते अनेक बडे व्यक्तीशी जवळीकता
भारतातील 1992 सालचा शेयर मार्केट घोटाला याला पाठिबा तसेच राजीव गांधी हत्या प्रकरण यात त्याचा हात होता असे जानकर सांगतात.
बहारिनचे सुल्तान, ब्रिटनचे पंतप्रधान, फ्रेंच राष्ट्रध्यक्ष, ब्रूनाई चे प्रमुख असे अनेक बडे मासे त्याचा जाळ्यात अडकले. चंद्रास्वामीना इंग्रजी वचता तसेच लिहता येत नसे तरी सुद्धा त्यानी बऱ्याच विदेशी व्यक्तिवर स्वतःची छाप सोडली हे अकल्पनीय आहे.
चंद्रास्वामी हे समोरच्या व्यक्तिवर छाप सोडत असत ज्यामुळे त्याना व्यक्ति बरोबर जवळीकता निर्माण करता येत असे,
अनेकांची मते
नरसिम्हा राव याचे वरिष्ठ सल्लागार असलेले श्री वेद प्रताप वैदिक सांगतात की चंद्रास्वामी ना कोणतीही कुंडली तसेच भविष्यवानी करता येत नसत, ते फक्त हिन्दुस्थान समाचार मधे काम करणारे रामरूप गुप्त याच्या कडून लोकांची कुंडली दाखवून त्याचा कडून ते भविष्य जाणून घेत आणि तीच माहिती परत लोकना सांगत.पैसे आणि ताकत असलेले शक्तिवान लोकना चंद्रा स्वामी अपलेसे करत.
भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि चंद्रास्वामी
सऊदी अरेबिया चा शास्त्र व्यापारी अदनान खगोशी यांच्याशी जवळीक साधत भारतीय गुप्तचर यंत्रणा म्हणजेच RAW ची मदत सुद्धा चंद्रा स्वामी नी केली.
जेष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी सांगतात की 1992 1993 मधे जेव्हा चंद्रास्वामी च्या आई चे निधन झाले असता त्यावेळी 40 ते 45 हजार लोक तसेच 20 बॉलीवुड सेलेब्रेटी सुद्धा हजार होत्या.
जेष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी सांगतात की रामजन्म भूमि प्रकरणात त्यानी मध्यस्ति केली. अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व असून सुद्धा त्याना सर्व पक्षात मनाचे स्थान होते.
चंद्रास्वामींचा निधन
1989 च्या सुमारास पामेला बोर्ड्स यांची कहानी काही औरच सांगते, पामेला ही अदनान खगोशी आणि चंद्रा स्वामी सोबत ती सेक्सुअल प्रजेंटर म्हणून काम करत.
1996 नन्तर मात्र चंद्रास्वामी चे दिवस बदलले ,एका मागून एक खटले दखल झाले, सर्व ठिकाणी ओळख तसेच मैत्री की काय या मुळे इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होवून सुद्धा त्याना दिल्लीच्या आलीशान बंगल्यात रहन्यास मिळाले.
चंद्रास्वामीनी नन्तर मात्र काळ आदन्यात अवस्तेत घलवला, 23 मे 2017 रोजी चांद्रस्वामी चे निधन झाले.
लेखक
– वैभव रूद्रवार