ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक कोण आहेत ? जाणून घ्या सविस्तर माहिती.

नुकतीच घडलेली, भारतीयांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सूनक.  ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा पंतप्रधानपदावरील दावा फेटाळण्यात आल्यानंतर भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते घोषीत करण्यात आले. त्यानंतर सुनक यांची ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून घोषणा झाली.

 

काही दिवसांपूर्वी ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. केवळ दीड महिन्याच्या कालावधीत केवळ ४५ दिवसांत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. लिझ ट्रस या ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधी लाभलेल्या पंतप्रधान ठरल्या. त्यानंतर झालेल्या निवडीमध्ये सुनक पंतप्रधान झाले आहेत. आणि ही आपल्या भारतीयांसाठी मोठी आनंदाची बाब आहे. 

 

काही दिवसापूर्वी लिझ ट्रस यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा सुनक याना संधी मिळाली. सुनक यांच्या रुपाने ब्रिटनमध्ये पहिल्यादांच भारतीय वंशाचा पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे ही भारतासाठीही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

 

गेल्या महिन्यात, माझी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्वासाठी झालेल्या निवडणुकीत सुनक यांचा पराभव केला होता. तेव्हा ट्रस यांना ५७.४. टक्के आणि सुनक यांना ४२.६ टक्के मते मिळाली होती. मात्र, ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर सुनक यांना संधी मिळाली. ऋषी सुनक यांचे आजोबा पंजाबमधून ब्रिटनला पोहोचले होते. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावाई आहेत.

 

ब्रिटिशांना सडेतोड उत्तर

 

एकेकाळी ब्रिटननं भारतावर १५० वर्षाहून अधिक काळ राज्य केलं होतं. त्याच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचा व्यक्तीची निवड होणं इतिहासाचा काव्यागत न्याय असल्याचं म्हटलं जातंय. ऋषी सुनक यांनी २०१५ मध्ये राजकारणात पाऊल ठेवलं होतं. अवघ्या सात वर्षांच्या काळात त्यांनी सर्वोच्च पदापर्यंत झेप घेतली आहे. आणि ही आपल्या भारतीयांसाठी फार अभिमानाची बाब आहे. 

 

कोण आहेत ऋषी सूनक ? 

 

सध्या बहुचर्चित असलेले ऋषी सुनक यांचा जन्म १२ मे १९८० रोजी इंग्लंडमधील साउथम्प्टन येथे झाला. ऋषी यांच्या आईचे नाव उषा आणि वडिलांचे नाव यशवीर सुनक आहे. यशवीर सुनक हे व्यवसायाने डॉक्टर असून आई उषा सुनक या फार्मासिस्ट आहेत. ऋषी सुनक यांना दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या पत्नीचे नाव अक्षता मूर्ती आहे. अक्षता या भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. अनुष्का आणि कृष्णा अशी ऋषी सुनक याच्या दोन्ही मुलींची नावं आहेत.

 

खरंतर ऋषी सुनक यांचे प्राथमिक शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. त्यांनी पुढील शिक्षण विंचेस्टर कॉलेज आणि ऑक्सफर्डमधून पूर्ण केले. सुनक यांनी २००६ मध्ये एमबीए करण्यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठ गाठले आणि येथेच त्यांना आयुष्याची जोडीदार भेटली. येथे त्यांची ओळख अक्षता मूर्ती यांच्याशी झाली. अक्षताही तेथे एमबीए करत होत्या. स्टॅनफोर्डमध्येच दोघांमधील प्रेम फुलले. २००९ मध्ये ऋषी यांनी अक्षतासोबत विवाह केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऋषी यांना गोल्डमन सेक्समध्ये नोकरी मिळाली. परंतु २००९ मध्ये त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ऋषीच्या पत्नीचंही इंग्लंडमध्ये मोठं नाव आहे. अक्षता यांचा इंग्लंडमध्ये स्वतःचा फॅशन ब्रँड आहे. अक्षता या सध्या इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. त्यामुळे अक्षता यांचे नाव देखील बऱ्याच जणांना माहिती आहे. 

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts