खिशात किंवा बॅगेत व्यवस्थितरित्या ठेवलेला इअरफोन ऐनवेळी गुंता झालेल्या अवस्थेतच आपल्याला सापडतो. मात्र यामागचे कारण काय ? असे नेहमी का होते ? हे प्रश्न कदाचित तुम्हाला पडले असतील. चला तर आज आपण जाणून घेउया इअरफोनचा गुंता होण्यामागील कारण.
हल्ली जवळपास सगळेच जण स्मार्ट डिव्हाईस वापरत असताना earphone wires स्वतः जवळ ठेवतात . पण इअरफोन वापरणाऱ्या सर्वांनाच एका समस्येला तोंड द्यावं लागतं ते म्हणजे ऐनवेळी झालेला इअरफोनचा गुंता अनेकांना तो सोडवताना नाकी नऊ येतात.
खिशात किंवा बॅगेत व्यवस्थितरित्या ठेवलेला इअरफोन ऐनवेळी गुंतलेल्या अवस्थेत पाहायला मिळते. ते सोडवत असताना अनेकांची चिडचिड झाल्याचं पाहायला मिळतं.
पण हा गुंता नेमका होतो कसा? | Why do earphone wires get tangled
आतापर्यंत तुम्हाला असे वाटत असेल की इअरफोन्स गुंता होण्यामागे तुमची चूक आहे पण निश्चितपणे तसे नाही. जेव्हा जेव्हा इअरफोनच्या तारांचा गुंता होता त्यामागे काही शास्त्र काम करते आणि हे शास्त्र ‘नॉट थिअरी’ (knot theory) या नावाने ओळखले जाते.
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या दोन संशोधकांनी इअरफोन्सच्या वायर्समधील गुंत्याबद्दल एक मनोरंजक संशोधन केलेले आहे. 2012 मध्ये, दोन्ही संशोधकांनी या गुंत्यांच्या संदर्भातील सिद्धांताचा अभ्यास केला होता, ज्यामध्ये त्यांना आढळले की या वायर्सच्या अडकण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या लांबीच्या अनेक वायर्सचा एक प्रयोग केला आणि त्यांना असे आढळून आले की, वायर्सचा गुंता व्हायला फक्त 10 सेकंद लागतात. या सिद्धांताला गाठ सिद्धांत या नावाने ओळखले जाते.
या सिद्धांताचा अभ्यास करताना संशोधकांनी वेगवेगळ्या लांबीच्या तारा घेतल्या आणि बॉक्समध्ये ठेवून त्या फिरवायला सुरुवात केली.या प्रयोगात संशोधकांना असे आढळून आले की बॉक्स 5-10 वेळा फिरवल्यानंतर 10 सेकंदात इअरफोन्सचा गुंता होतो. तारांच्या या अडकण्याच्या प्रक्रियेत तारांची लांबी आणि जाडी यामुळेही फरक पडतो. तार जितक्या लांब आणि मऊ असतील तितका त्याचा गुंता होण्याची शक्यता जास्त असते.