नवरात्रीत गरबा का खेळला जातो ? जाणून घ्या यामागील धार्मिक कारण.

नवरात्रीचा उत्सव म्हटल्यावर एक वेगळंच चैतन्य वातावरण निर्माण होते. घटस्थापना, ते नऊदिवस देवीची उपासना सेवा, व्रतवैतल्य, आणि भाविकांची अफाट श्रद्धा यामुळे शरीरात प्रचंड ऊर्जा निर्माण होत असते. सोबतच ठरलेल्या दिवसात गरब्याचे आयोजन होतच असते. आता गरबा म्हटल्यावर देखील रसिकांच्या मनात एक वेगळीच ओढ असते. खरंतर, अनेक तरूणाईला गरब्याची आवड असते. अगदी गरबा खेळण्यासाठीही ते जातात. मनसोक्त गरबा खेळतात. मात्र, त्यांना फक्त नवरात्रीतच गरबा का खेळला जातो ? किंवा नवरात्री आणि गरबा यांचा काय संबंध आहे ? याबाबत फारशी कल्पना नसते. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात काही माहिती सांगणार आहोत. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला गरबा खेळण्यामागील रहस्यमय कथा सांगणार आहोत. हा लेख वाचून तुम्हाला गरबा खेळणयास आणखी ऊर्जा संचारेल हे मात्र नक्की. मग चला तर वेळ ना गमावता जाणून घेऊयात या मागील रहस्य.

Why Garba Play in Navratri ?

यासाठी नवरात्रीत गरबा खेळला जातो

 

सध्याच्या आधुनिक काळात नवरात्रीतील ‘गरबा’ हा एक ट्रेण्ड सुरू झालाय. या काळात गरब्यामध्ये एक स्पर्धेचं किंवा फॅशनचं युग जरी आलं असलं तरी मात्र, देवीच्या दरबारात गरबा खेळण्याला एक धार्मिक महत्त्व आहे. माते अंबेने महिषासुराचा वध केला असे मानले जाते. महिषासुराच्या अत्याचारापासून मुक्ती मिळाल्यावर लोकांनी नृत्य केले. या नृत्याला लोक ‘गरबा’ म्हणून ओळखले जाते. माँ अंबे यांना हे नृत्य खूप आवडते अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि त्यामुळेच मातेची स्थापना केल्यानंतर श्रद्धेने गरबा करण्याची परंपरा सुरू आहे. यामुळे माता प्रसन्न होते, असे देखील मानले जाते. आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघित्यास या नृत्याने संपूर्ण शरीराची हालचाल होऊन आपल्या शरीरयष्टीचा फारच चांगला विकास होत असतो.

 

गरब्यामागील पौराणिक कथा

 

पारंपारिकपणे मातीच्या भांड्याभोवती दिवा लावून गरबा केला जातो, ज्याला ‘गर्भ दीप’ म्हणतात. हे एक प्रतीकात्मक आहे. नर्तक या मातीच्या भांड्यात किंवा घागरीभोवती वर्तुळात फिरतात आणि हात आणि पायांनी गोलाकार हालचाल करतात. हा हावभाव जीवनाच्या चक्राचे प्रतीक देखील मानला जातो. जो जीवनापासून मृत्यूपर्यंत पुनर्जन्मापर्यंत प्रगती करतो. मातीचे भांडे किंवा गार्बो हे गर्भाचे प्रतीक आहे. 

 

यामागील एक रहस्य असे की, अंबा माता (अंबे माँ) ही एक स्त्री आणि जगाची रक्षक आहे. ती आपल्या मुलांचे बाह्य जगाच्या क्रोधापासून संरक्षण करते आणि प्रत्येक आईप्रमाणेच आपल्या मुलांसाठी उभी राहते. आतील प्रकाश हे गर्भातील बाळाचे प्रतीक आहे. हा प्रत्येक स्त्रीचा, विशेषतः मातांचा सन्मान आहे. गर्भ देखील जीवन देणारा आहे, जिथे शरीर जन्म घेते आणि आकार घेते. यासाठी नवरात्रीत गरबा खेळण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हीदेखील येत्या नवरात्रीत गरब्याचा आनंद घ्या.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts